मुंबई - स्वरा भास्करने फेब्रुवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर पती फहाद अहमदसोबत तिने मार्चमध्ये थाटामाटात लग्नगाठ बांधली. त्यानंतर ६ जून रोजी तिने गुड न्यू दिल्याने चाहते या वेगवान घडामोडीने चकित झाले होते. आता स्वराने सोशल मीडियावर आपला बेबी बंप दाखवत फोटो शेअर केला आहे. स्वराचा पती फहाद अहमद हा सिनेक्षेत्रातील नसून समाजवादी पार्टीचा तो प्रदेश युवा अध्यक्ष आहे. दोघेही पहिल्या मुलाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत.
शनिवारी बेबी बंप दाखवत स्वराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यावेळी तिने जांभळ्या आणि निळ्या रंगाचा मॅटर्निटी ड्रेस परिधान केला होता. वाढलेल्या फोटोसह तिने लाकडी बुकशेल्फच्या शेजारी स्मितहास्य देत पोझ दिली आहे.
जून महिन्यात तिने गर्भवती असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी तिच्या चात्यांनी स्वरा आणि फहाद अहमदवर शुभेच्छा संदेशाचा वर्षाव केला होता. स्वरा बिनधास्त राजकीय मते मांडत असल्यामुळे तिचा राग करणारे खूप ट्रोलर्स आहेत. त्यांना ही बातमी काही पचनी पडली नव्हती. त्यांनी इतक्या कमी अवधीत प्रेग्नंसीच्या बातमीवर टीका करण्याचा प्रयत्न केला. 'म्हणून होती का लग्नाची घाई', अशी शेरेबाजीही तिच्यावर करण्यात आली. फहादवरही टीका करणारे कमी नव्हते. पण ट्रोलर्सना कसे धुडकावून लावायचे याच्यात मास्टर असलेल्या स्वराने याकडे दुर्लक्ष केले. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या घरी नव्या सदस्याचे आगमन होणार आहे.
आपल्या राजकीय मतांसाठी बिनधास्त बोलणाऱ्या स्वराची आणि फाहद अहमदची ओळख एका आंदोलनादरम्यान झाली. ओळखीचे प्रेमात आणि प्रेमाचे रुपांतर व्हायला अवघ्या काही महिन्यांचा अवधी दोघांना लागला. अखेर ६ जानेवरीला दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह नोंदणी केली. या नोंदणीच्या वेळचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यांतर दोघांनी दोन्हीकडचे पाहुणे आणि नातेवाईक, मित्र मंडळींसह मार्चमध्ये धुमधडाक्यात शादी केली. त्यांचा सुखी संसार बहरत चालला असून संसारवेलीवर एक सुंदर फुल ऑक्टोबर महिन्यात उगवणार आहे.