महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Swara Bhaskar Wedding : स्वरा भास्करने डेस्टिनेशन वेडिंगचा बेत सोडला, आजीच्या घरी करणार विवाह - फहाद अलीगड मुस्लिम विद्यापीठातून उत्तीर्ण

पारंपरिक चौकट पुन्हा एकदा तोडून, स्वरा भास्करचा फहाद अहमद यांच्याशी नवी दिल्लीतील तिच्या आजीच्या घरी लग्नगाठ बांधणार आहे. 11 मार्च रोजी हळदीपासून मेहेंदी, संगीत आणि शेवटी 16 मार्च रोजी लग्न असा हा विवाह आठवडाभर चालणार आहे.

Swara Bhaskar Wedding
: स्वरा भास्करने डेस्टिनेशन वेडिंगचा बेत सोडला

By

Published : Mar 4, 2023, 5:33 PM IST

मुंबई - 'अनारकली ऑफ आरह', 'वीरे दी वेडिंग', 'निल बट्टे सन्नाटा' आणि 'रांझना' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या स्वरा भास्करने समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष फहाद अहमद याला प्रेमात जिंकले आहे. या जोडप्याने मुंबईतील कोर्टात लग्नाची नोंदणी केली आणि लवकरच पारंपारिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी खूप विचार केल्यानंतर डेस्टिनेशन वेडिंगचा बेत सोडून दिला आहे आणि लग्नाच्या कार्यक्रमांसाठी दिल्लीतील स्वराचं माहेरचं घर निश्चित केलं आहे. टीव्ही अभिनेत्री श्रुती सेठने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्वराच्या लग्नाच्या कार्डची झलक शेअर केली, जी स्वराने तिच्या इन्स्टास्टोरी विभागात पुन्हा शेअर केली. कुटुंबाच्या जवळच्या एका सूत्राने उघड केले की हे जोडपे त्यांच्या जवळचे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न समारंभ करण्यासाठी भारतीय विधींचे पालन करतील.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद लग्न पत्रिका

त्यांनी 11 ते 16 मार्च या काळात हा विवाह हळदी, संगीत आणि मेहंदीपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या अंतिम विधीसाठी निश्चित केला आहे. स्वराने याआधी फहाद अहमदसोबत तिच्या लग्नाची आनंदाची बातमी ट्विटरवर शेअर केली होती. दोघांची पहिली भेट जानेवारी 2020 मध्ये विवादास्पद नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधातील तिच्या सहभागादरम्यान झाली होती. अहमद यांनी विद्यार्थी नेता म्हणून सीएएला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तरुण जमावाचे आयोजन केले होते.

अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर त्यांच्या प्रेमकथेच्या सर्व मोहक क्षणांचा व्हिडिओ मॉन्टेज शेअर केला होता. जानेवारी 2020 मध्ये, दोघे एका आंदोलनाच्या ठिकाणी भेटले आणि प्रेमाचा तह करुन मोकळे झाले. मुंबईतील राजकीय कार्यकर्ता असलेला फहाद अलीगड मुस्लिम विद्यापीठातून उत्तीर्ण आहे आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) मधून सामाजिक कार्यात एम.फिल. पदवीधारक झालेला आहे.

2017 आणि 2018 मध्ये, फहाद अहमद हा TISS विद्यार्थी संघटनेचा सरचिटणीस म्हणून निवडला गेला होता, आणि CAA विरोधी निदर्शनांमध्ये तो एक प्रमुख चेहरा होता. त्याने विविध महाविद्यालयांमधून मोठ्या संख्येने जनसमुदाय खेचून आंदोलनाचा मुंबईत पाय तयार केला होता. फहाद सध्या समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवा सभेचे महाराष्ट्र युनिट प्रमुख आहे.

हेही वाचा -Deepika Rocks Chic Look : ऑस्कर 2023 मध्ये प्रेझेन्टर म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदा दीपिका पदुकोणने लावली सार्वजनिक हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details