मुंबई - अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज चाहत्यांनी दिली आहे. स्वराने तिचा पती फहाद अहमदसोबतचे सुंदर फोटो शेअर करत तिने आपला बेबी बम्प दाखवला. तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना स्वरा भास्करने कॅप्शनमध्ये लिहिले, 'कधीकधी तुम्ही केलेल्या सर्व प्रार्थनांचे एकाच वेळी उत्तर मिळते. आता पूर्णतः नव्या जात प्रवेश करताना धन्य, कृतज्ञ आणि भरुन पावले आहे.' स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या विवाहानंतर काही महिन्यातच गुड न्यूज मिळाल्याने चाहत्यांमध्ये असलेला उत्साह पोस्टवरील कमंट सेक्शनमध्ये दिसत आहे. अनेकांनी स्वराचे अभिनंदन केले आहे. तिच्या या नव आयुष्यासाठी अनेकजण शुभेच्छा देत आहेत. तर स्वरावर नेहमी टीका आमि ट्रोल करणारा एक वर्गही या बातमीने जागा झाला आहे व तिच्यावर टीकेची झोड उठवत आहे. विवाहाच्या चार महिन्यानंतर स्वराने आई होणार हे घोषित केल्यानंतर काहीजण तिच्यावर टीकाही करत आहेत. म्हणूच लग्नाची घाई केली होती का असा सवाल एक युजरने केला आहे. काही तरी गडबड होती म्हणूनच निकाह केला होता असेही एकाने लिहिलंय.
स्वरा भास्करने फेब्रुवारी महिन्यात समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत नोंदणी विवाह केला होता. त्यानंतर मार्चमध्ये दोघांनी थाटामाटात विवाह केला. काही दिवसापूर्वीच स्वरा आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळत होत्या. यापार्श्वभूमीवर अधिक वेळ न दवडता स्वतः स्वरानेच याविषयावरील पडदा दूर केला आहे.
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून डेटिंग सुरू होते. या गोष्टीचा थांगपत्त त्यांनी कुणालाही लागू दिला नव्हता. एनआरसीच्या आंदोलनात फहाद अहमद सक्रिय होता. याच दरम्यान त्यांची ओळख झाल्याचे सांगण्यात येते. हळूहळू त्यांचील प्रेम फुलत गेले आणि दोघांनी लग्न करण्याच निर्णय घेतला. दोघांचा सुखी संसार आता बहरत चालला असून घरात पाळणा हलणार असल्याने दोन्ही परिवारात आनंदाचे वातावरण आहे.