मुंबई- सुष्मिता सेनचा माजी प्रियकर रोहमन शॉल याने ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचे नाते सार्वजनिक केल्याबद्दल सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. रोहमनने सोशल मीडियावर एक गुढ पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्यात ललित मोदीला डेट करण्यावरून झालेल्या प्रतिक्रियांदरम्यान रोहमन शॉल आपल्या माजी प्रेयसीचा बचाव करत आहे.
सुष्मिता २०१८ मध्ये इन्स्टाग्रामवर भेटल्यानंतर मॉडेल रोहमन शॉलला डेट करायला सुरुवात केली होती. काही वर्षे एकत्र फिरल्यानंतर गेल्या वर्षी या जोडप्याने वेगळे होण्याची घोषणा केली. ब्रेकअपनंतरही दोघांमधील मैत्रीचे संबंध कायम आहेत. एका वेबलॉइडशी बोलताना रोहमनने म्हटले आहे की, ''सुष्मिताच्या निवडीवर शंका घेण्यास जागा नाही.'' मॉडेल-अभिनेत्याने सांगितले, "चला त्यांच्यासाठी आनंदी होऊया ना. प्रेम सुंदर आहे. मला एवढेच माहित आहे की जर तिने एखाद्याला निवडले असेल तर तो तिच्यासाठी योग्य आहे."
शुक्रवारी रोहमनने सोशल मीडियावर एक गुढ नोटही शेअर केली. इंस्टाग्रामवर रोहमनने एक टीप शेअर केली, ज्यात लिहिले आहे, "किसी पर हसने से अगर तुम्हें सुकून मिल जाए तो हस लेना!! क्यूंकी परेशन वो नहीं, तुम हो!! प्रेमाचा प्रसार करा तिरस्काराचा नाही."
मॉडेलने सोशल मीडियावर तिच्या माजी मैत्रिणीची खिल्ली उडवल्याबद्दल ट्रोलर्सवर अप्रत्यक्ष खणखणीत टीका केली. रोहमनला सध्या सोशल मीडियावर खूप प्रतिक्रियेला सामोरे जावे लागत आहे, कारण त्याची कथित प्रेयसी IPL संस्थापक ललित मोदीसोबत प्रेमात पडली आहे.