महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ललित कुमार मोदींसोबतच्या नात्यानंतर सुष्मिता सेनचे बिघडले भावासोबतचे संबंध? - सुष्मिता सेन

सुष्मिता सेन आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांच्यातील नात्याचा खुलासा झाल्यानंतर अभिनेत्रीचा भाऊ राजीव सेनसोबतचे संबंध बिघडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

सुष्मिता सेन आणि राजीव सेन
सुष्मिता सेन आणि राजीव सेन

By

Published : Jul 15, 2022, 5:27 PM IST

मुंबई - माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे संस्थापक ललित कुमार मोदी यांच्यातील नात्याचा खुलासा होताच मनोरंजनापासून ते क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. या खुलाशानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधान आले आहे. सुष्मिता आणि ललित यांच्यातील नाते समोर येताच अभिनेत्रीच्या चाहत्यांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. इकडे अभिनेत्रीचा भाऊ राजीव सेन यांनाही धक्का बसला असून ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. पण या खुलाशानंतर सुष्मिता सेनने भाऊ राजीवला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे आणि वहिनी चारू असोपाला फॉलो करत आहे.

राजीवने बहीण सुष्मिताला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले पण तो बिझनेसमन ललित मोदींना फॉलो करत आहे. या नात्याचा खुलासा झाल्यानंतर सुष्मिता सेनच्या घरात काहीच चांगले चालले नसल्याची माहिती आहे.

याआधी सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याच्या खुलाशावर राजीव सेन म्हणाले, 'माझ्या बहिणीकडून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही, खरे सांगायचे तर मला याबाबत काहीच माहिती नाही. मी स्वत: आश्चर्यचकित झालो आहे आणि मी स्वत: त्यांच्याशी बोलणार आहे. मात्र याआधी बहीण-भावाची नाराजी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

14 जुलै रोजी इंडियन प्रीमियर लीकचे जनक ललित कुमार मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या रोमँटिक फोटोंसह ट्विटरवर एक पोस्ट करत म्हटले की, तो आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. ललित मोदींच्या या ट्विटनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे.

14 जुलै रोजी इंडियन प्रीमियर लीकचे जनक ललित कुमार मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या रोमँटिक फोटोंसह ट्विटरवर एक पोस्ट पोस्ट करत म्हटले की, ते आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. ललित मोदींच्या या ट्विटनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे.

ललित आणि सुष्मिताच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याचवेळी एका छायाचित्रात सुष्मिताच्या बोटातील अंगठी पाहून अभिनेत्रीने ललित मोदींसोबत गुपचूप एंगेजमेंट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -Lalit Modi Life : सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या मोदीने, विजय मल्ल्याच्या मुलीला ठेवले होते पर्सनल असिस्टंट

ABOUT THE AUTHOR

...view details