मुंबई :'ताली' या वेबसिरीजमध्ये ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंतच्या भूमिकेत अभिनेत्री सुष्मिता सेन दिलणार आहे. ही भूमिका चोखपणे पार पाडण्यासाठी तिला 6 महीने लागले, परंतु तिने प्रत्येक संवाद मनापासून शिकला. ही वेबसिरीज ट्रान्सजेंडर समुदायाला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली, यावर आधारीत आहे. गौरी सावंतची जनहित याचिका (सार्वजनिक हित याचिका) होती, ज्यामुळे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय झाला होता.
भूमिकेसाठी चांगलीच तयारी केली: 'ताली' मधील सर्जनशील जोडी अर्जुन सिंग बरन आणि कार्तक डी. निशानदार यांनी उघड केले की सुष्मिताने तिच्या भूमिकेसाठी चांगलीच तयारी केली. या सर्जनशील जोडीने सांरितले की, गौरीच्या जीवनात सुष्मिताने उत्कटतेने स्वतःला विसरून दिले होते. ते पुढे म्हणाले स्क्रिप्ट बरोबर येण्यासाठी तिला सहा महिने लागले, तिला ते मनापासून कळले होते. त्यामुळे शूटिंगदरम्यान आम्ही एखादी ओळ जोडली किंवा बदलली तर ती लगेच आम्हाला सुधारत होती. ती तिच्या भूमिकेचा खुप चांगला अभ्यास करत होती.