महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sushmita sen : सुष्मिता सेनने 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना दिले चांगलेच प्रत्युत्तर... - ताली

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा 'ताली' हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये ती कार्यकर्त्या गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. सुष्मिता सेनने एका मुलाखतीच्या दरम्यान तिला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना धारेवर धरले आहे.

Sushmita sen
सुष्मिता सेन

By

Published : Aug 5, 2023, 5:07 PM IST

मुंबई : एकेकाळची 'मिस युनिव्हर्स', बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या आगामी 'ताली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'ताली' या चित्रपटामध्ये ती एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. रूपेरी पडद्यावर सुष्मिता सेन पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत झळकणार आहे. 'ताली' हा चित्रपट कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांच्या चरित्रावर आधारित आहे. या चित्रपटात सुष्मिता सेन गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सुष्मिता तिच्या आगामी 'ताली' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता नुकत्याच एका झालेल्या मुलाखतीदरम्यान सुष्मिता सेनने तिला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले.

सुष्मिता सेन आली चर्चेत :यापूर्वी सुष्मिता सेन इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याशी प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आली होती. लंडनमधील सुष्मिता सेनसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर सुष्मिताला सोशल मीडियावर अनेकजण 'गोल्ड डिगर' म्हणायला लागले. अनेक लोकांना त्यावेळी सुष्मिताचा राग आला होता. त्यानंतर सुष्मिता सेननेही अशा यूजर्सविरोधात एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. सुष्मिताच्या या पोस्टवर काही युजरने तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलबद्दल विचारले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता या प्रकरणावर बोलली आहे. 'गोल्ड डिगर' म्हटल्यावर सुष्मिताने प्रतिक्रिया दिली की, मला वाटते ते चांगले आहे, मी त्यावेळी 'गोल्ड डिगर'ची व्याख्या लोकांना सांगू शकले असते. हा एक अपमान आहे. आपण या बाबींशी स्वतःचा संंबंध जोडला की अपमान होतो. मात्र मी असे केले नाही. मी यापासून दूर राहिले. माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी आहे, ज्याबद्दल लोकांना काही घेणेदेणे नाही.

सुष्मिता केली पुष्टी : सुष्मिताने पुष्टी केली आहे की, ती कोणालाही डेट करत नाही आणि ती अजूनही सिंगल आहे, गेल्या वर्षी तिने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने तिला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना उत्तर दिले होते. मी सोन्यापलीकडे मौल्यवान आहे, मी स्वतःला 'हिरा' समजते, अशा आशयाची लांबलचक पोस्ट तिने लिहीली होती. दरम्यान सुष्मिता सेनचा 'ताली' हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Kangana Ranaut : कंगना रणौतचा हॉरर कॉमेडी 'चंद्रमुखी २'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
  2. Ajay Devgan wishes Kajol : 'तारीफ करुं क्या तेरी...' म्हणत अजय देवगणने काजोलला दिल्या रोमँटिक शुभेच्छा!
  3. kajol devgan : काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर काबीज केली बॉलिवूड चित्रपटसृष्टी....

ABOUT THE AUTHOR

...view details