महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vishal Gurnani diwali bash : एक्स रोहमन शॉलसोबत सुष्मिता सेनच्या आगमनानं चाहत्यांच्या नजरा विस्फारल्या - सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल

Vishal Gurnani diwali bash : चित्रपट निर्माता विशाल गुरनानी यांनी आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनला अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली. माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि अभिनेता-मॉडेल रोहमन यांनीही उपस्थिती दर्शवल्यानंतर चाहत्यांच्या नजरा विस्फारल्या आहेत.

Vishal Gurnani diwali bash
रोहमन शॉलसोबत सुष्मिता सेन

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 11:02 AM IST

Updated : Nov 8, 2023, 12:22 PM IST

मुंबई- Vishal Gurnani diwali bash : सुष्मिता सेन आणि तिचा माजी प्रियकर रोहमन शॉल यांनी चित्रपट निर्माता विशाल गुरनानी यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत हजेरी लावल्यामुळे पुन्हा एकदा काही चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुष्मितानं आधी सांगितल्यामुसार 2021 मध्ये तिचे आणि रोहमनचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर विभक्त राहून एकमेकांशी संपर्क त्यांनी ठेवला होता. अलीकडच्या काळात अनेकदा ते एकत्र दिसलेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी सेलेब्रिशनला ते हजर राहिल्यानं त्यांचा रोमान्स जारी असल्याचं बोललं जातंय.

सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओत सुष्मिता सेन तिचा माजी प्रियकर रोहमन शॉलसोबत दिवाळी पार्टीत प्रवेश करताना दिसतेय. गुलाबी बॉर्डर असलेल्या काळ्या साडीत ती सुंदर दिसत होती. यासाठी तिनं हलका मेकअप केला होता आणि तिनं स्टेटमेंट नेकलेससह ऍक्सेसराइज केलं होतं.

डिसेंबर 2021 मध्ये सुष्मितानं इंस्टाग्रामवर मॉडेल रोहमन शॉलसोबत ब्रेकअप करत असल्याचं जाहीर केलं होतं. रोहमनने तिला फोटो शेअरिंग अ‍ॅपवर एक मजकूर पाठवल्यानंतर 2018 मध्ये ते दोघे इन्स्टाग्रामवर भेटले होते. व्यावसायिक आघाडीवर, सुष्मिता सेन नुकतीच 'आर्या 3' या वेब सिरीजमध्ये दिसली होती. या मालिकेच्या यशात तिचं मोठ योगदान होतं. त्यानंतर 'ताली' हा तिचा चित्रपटही गाजला. यामध्ये तिनं श्रीगौरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारली.

या पार्टीसाठी रोहमन शॉलनं हिरव्या रंगाच्या जॅकेटसह पांढरा कुर्ता असा सेट परिधान केला होता. या जोडप्यानं पापाराझींसाठी फोटो देखील दिले. व्हिडिओमध्ये रोहमन सुष्मिताचा हात धरून तिला साडीत चालण्यासाठी मदत करताना दिसतोय. रोहमनसोबत पोझ देत तिच्या सदाबहार हास्यानं कॅमेऱ्यांना अभिवादन करणाऱ्या सुष्मितानं त्यांच्यातील नातं अजूनही सुरक्षित असल्याचं संकेत दिलं.

फोटोशूट दरम्यान, सुष्मिता हसत असताना रोहमननं तिला जवळ धरलं. नंतर तिनं मीडियासाठी एकटीनं पोज दिली. माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि अभिनेता-मॉडेल रोहमन यांच्या सोशल मीडियावरील लेटेस्ट व्हिडिओनंतर दोघांच्याही चाहत्यांनी समाधान व्यक्त केलंय आणि प्रतिक्रियांसह शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

सुष्मिता सेन अलिकडे अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात रोहमन शॉलसोबत दिसली आहे. सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काही दिवसांनी मार्चच्या सुरुवातीला झालेल्या फॅशन वीकमध्येही तो तिच्यासोबत गेला होता.

हेही वाचा -

  1. Honey Singh Divorce : हनी सिंगचा १२ वर्ष जुना संसार तुटला, पत्नी शालिनी तलवारशी घटस्फोट

2.Katrina Kaif : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर कतरिना कैफ 'मॉर्फ'च्या जाळ्यात

3.Don 3 Update : रणवीर सिंगसोबत 'डॉन 3'मध्ये जंगली बिल्लीचीही होणार एंट्री ?

Last Updated : Nov 8, 2023, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details