महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sushmita Sen सुष्मिता सेनने साजरा केला अँजिओप्लास्टीला एक महिना पूर्ण झाल्याचा आनंद - Gauri Sawant

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर एक मोनोक्रोम क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती तिच्या अँजिओप्लास्टीला एक महिना पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

Etv Bharat
सुष्मिता सेन

By

Published : Mar 30, 2023, 5:08 PM IST

मुंबई - मिस युनिव्हर्स 1994 ची सौंदर्यवती आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने काही आठवड्यांपूर्वी सांगितले होते की तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. यासोबतच स्टेंटही बसवण्यात आला होता. अभिनेत्री सुष्मिताने सांगितले होते की ती आता बरी आहे. आजारातून बरी झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर सुष्मिता सेन पुन्हा कामावर परतली आहे. अलीकडेच सुष्मिता सेनने तिच्या अँजिओप्लास्टीचा एक महिना पूर्ण झाल्याची एक क्लिप शेअर केली आहे.

अँजिओप्लास्टीला एक महिना पूर्ण- सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मोनोक्रोमॅटिक क्लिप पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या क्लिपच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'माझ्या अँजिओप्लास्टीला एक महिना पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. मला जे करायला आवडते तेच काम करत राहते. लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन आणि फ्लेव्हियन हेल्ड त्यांची जादू निर्माण करत आहेत. कायमचे आवडते हे सुंदर गाणे पुन्हा पुन्हा वाजते. या क्लिपच्या पार्श्वभूमीवर सुष्मिताने शफकत अमानत अलीचे 'आंख के सागर' हे गाणे जोडले आहे.

शुटिंग सेटवर परतली सुष्मिता सेन - मोनोक्रोम क्लिपमध्ये सुष्मिता सेटवर शूटिंग करताना दिसत आहे. यादरम्यान तिने फुल स्लीव्हजचा टी-शर्ट घातला आहे. व्हिडिओच्या शेवटी, सुष्मिता सेन आनंदाने हसते आणि तिच्या टीमची एक झलक दाखवते. या पोस्टवर कमेंट करताना संगीतकार सोफीने लिहिले की, 'तू अद्वितीय आहेस.' त्यानंतर तिच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. 'लव्ह यू, लवकर बरे हो, मी आर्याची आतुरतेने वाट पाहत आहे', अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

'ताली'चे डबिंग आणि प्रोमो शूट पूर्ण केले - सुष्मिता सेनने बुधवारी तिच्या आगामी वेब सीरिज 'ताली'चे डबिंग आणि प्रोमो शूट पूर्ण केल्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'शेवटी आमचे ताली या वेबसिरीजचे डबिंग आणि प्रोमो शूट पूर्ण झाले आहे. या सुंदर टीमची खूप उणीव भासेल. किती भावपूर्ण प्रवास झाला आहे. 'ताली' च्या टॅलेंटबद्दल सर्व कलाकार आणि क्रूचे आभार. 'ताली' हा ट्रान्सजेंडर कार्यकर्ती गौरी सावंतचा बायोपिक आहे, ज्यामध्ये सुष्मिता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -Gifts From Alia Bhatt : सोनम कपूरचा मुलगा वायुला आलिया भट्टकडून गोंडस भेटवस्तू...

ABOUT THE AUTHOR

...view details