महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sushant Singh News :'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'ला सात वर्षे पूर्ण, दिशा पटानी सुशांतची आठवण काढत केली पोस्ट - सुशांतची आठवण काढत कृतज्ञता केली

M.S. Dhoni: The Untold Story: 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अभिनेत्री दिशा पटानीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसत आहे.

M S Dhoni The Untold Story
एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 10:42 AM IST

मुंबई - M.S. Dhoni: The Untold Story: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा त्याचा आजपर्यंतचा सर्वात अविस्मरणीय चित्रपट आहे. आजही हा चित्रपट पाहून अनेकजण सुशांतची आठवण काढतात. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी दिशा पटानीनं तिच्या इन्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली आहे. पोस्ट शेअर करत तिनं लिहलं, 'सुशांत, मला आशा आहे की तू आनंदी आणि शांत आहेस. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला. याशिवाय तिनं इंस्टाग्रामवर चित्रपटाची एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती आणि सुशांतसोबत दिसत आहेत.

दिशा पटानीनं शेअर केली पोस्ट : व्हिडिओ शेअर करताना दिशा पटानीनं लिहिलं की, 'या सुंदर प्रवासाबद्दल आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल कृतज्ञ, मनापासून प्रेम आहे. तुम्हाला आनंद देणार्‍या लोकांची कदर करा आणि गोष्टी ऐका. पश्चात्तापासाठी हे जग खूप लहान आहे. हा व्हिडिओ शेअर करताच तिच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच याशिवाय या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. अनिल कपूर यांनी पोस्टवर कमेंट शेअर करत लिहलं, 'अपूर्व दृश्य... तुम्ही दोघेही खूप चांगले आहात'. त्यानंतर अपारशक्ति खुरानानं लिहलं, 'मला या दृश्याची अचूनही तशीच आठवण आहे, अशा अनेक कमेंट सेलिब्रिटींनी केल्या आहेत. याशिवाय सुशांत सिंग राजपूतचे अनेक चाहते हा व्हिडिओ पाहून भावूक झाले आहेत.

दिशा पटानीच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या कमेंट :'एका यूजरन पोस्टवर कमेंट करत लिहलं, 'या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दृश्यांपैकी एक आहे. दुसर्‍यानं कमेंट केली, 'मिस यू एसएसआर', तर आणखी एकानं लिहलं, 'हा चित्रपट मी खूप वेळा पाहू शकतो. अशा अनेक कमेंट पोस्टवर येत आहेत. नीरज पांडे दिग्दर्शित, 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा आपल्या सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीवर बायोपिक आहे. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये दिवंगत सुशांत सिंग राजपूतनं धोनीची भूमिका केली होती. या चित्रपटात कियारा अडवाणीनं धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारली होती. याशिवाय या चित्रपटामध्ये दिशानं महेंद्रसिंग धोनीच्या गर्लफ्रेंडचा रोल केला होता. या चित्रपटानं 215.4 कोटीची कमाई केली होती. दिशा पटानीची सुशांतसोबतची केमिस्ट्री खूप गाजली होती. हा बायोपिक सुशांतच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरला होता.

वर्कफ्रंट : दिशा ही मोहित सूरीच्या अ‍ॅक्शन थ्रिलर 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत दिसली होती. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. दिशा आता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशि खन्ना अभिनीत 'योधा' या अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन चित्रपट 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसेल. तिच्यासोबत या चित्रपटात प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण हे देखील कलाकर दिसणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Swara Bhaskar Baby Girl : स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांना कन्यारत्न...
  2. kartik aaryan : काश्मीरच्या बर्फाळ नदीत स्नान करताना कुडकुडतोय कार्तिक आर्यन; पाहा व्हिडिओ...
  3. Box Office King SRK : 'पठाण आणि जवान'मुळे शाहरुख खान बनला बॉक्स ऑफिसचा किंग

ABOUT THE AUTHOR

...view details