तिरुपती- सुपरस्टार रजनीकांत यांनी गुरुवारी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना केली. मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत रजनीकांत दर्शनासाठी आले होते. मंदिरामध्ये पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध विधी केले. नंतर त्यांना रंगनायकुला मंडपम येथे वेद आशिर्वाचनम् अर्पण करण्यात आले.
पहाडी मंदिराचे कामकाज सांभाळत असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या अधिकार्यांनी, रजनीकांत आणि ऐश्वर्या यांचे मंदिराच्या मुख्य गेटवर आगमन झाल्यावर स्वागत केले.
बुधवारी वडील-मुलगी हे दोघे मंदिरात दाखल झाले होते आणि रात्रीच्या मुक्कामानंतर पहाटे दर्शन घेतले. रजनीकांत यांनी ७२ वर्षांचे झाल्यानंतर तीन दिवसांनी मंदिराला भेट दिली. त्यांच्या मुलीसह मंदिरात गेल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.