मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत सध्या आपल्या 'जेलर' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. रजनीकांतचा क्रेझ हा संपूर्ण जगात आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची धमाकेदार बुकिंग झाली होती. दरम्यान आता देखील चित्रपटगृहांमधील गर्दी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. थलैवाची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. पहिल्या दिवशी सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाने ४८.३५ कोटींची कमाई केली होती. ज्यापैकी ३७.६ कोटी फक्त तमिळ भाषेत होते. तर १०.२ कोटी तेलुगू भाषेतील कमाई होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २५ कोटींची कमाई केली, ज्यामध्ये तमिळ भाषेने सर्वाधिक कमाई केली.
'जेलर' चित्रपटाने केली इतकी कमाई : रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३४ कोटींचा गल्ला जमवला. दुसरीकडे, चौथ्या दिवशी कमाईचा आकडा ३८ कोटींच्या आसपास होता. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे ५ दिवस झाले असून देशांतर्गत या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १७८.६० कोटी रुपयांवर गेले आहेत. या चित्रपटाने फार कमी वेळात मोठा आकडा पार केला आहे. रजनीकांतचा जेलर हा या वर्षातील साऊथचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट देशांर्गत ३०० कोटीचा टप्पा देखील लवकर पार करेल असा अंदाज बांधला जात आहे. हा चित्रपट देशात नाहीत तर जगभरात चांगली कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाने पाचव्या दिवशी ३५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.