चेन्नई (तामिळनाडू) - Dhanush celebrates Pongal : आपल्याकडे साजरा होणारा संक्रांत हा सण दक्षिणेतील राज्यामध्ये पोंगल या नावाने साजरा केला जातो. या दिवशी सुर्यदेवाचा पूजा केली जाते आणि त्याला प्रसाद अर्पण केला जातो. या पारंपरिक सणानिमित्त अभिनेता धनुषने प्रार्थना केली आणि स्वत: त्याच्या कुटुंबासह पोंगल साजरा करतानाचा एक फोटो शेअर केला.
अभिनेता धनुषने सोमवारी त्याच्या X वर फोटो पोस्ट करताना लिहिले, "तुम्हा सर्वांना दैवी पोंगलच्या शुभेच्छा." फोटोत कुटुंबातील सर्व सदस्य पारंपरिक पोशाख परिधान केलेले दिसत आहेत.
पोंगल हा दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा आनंदी सण आहे. या सणाचा उत्सव चार दिवस चालतो. सोमवारी 15 जानेवारी रोजी सुरू झालेला हा उत्सव 18 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पोंगल हा सण शेतीसंस्कृतीशी संबंधित आहे. जेव्हा शेतामध्ये पीक कापणीला येते त्यावेळी भरभरुन उगवलेल्या पीकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी आणि गुरांसोबत असलेलं नात प्रकट करण्यासाठी हा सण महत्त्वाचा ठरतो.
भारतात हा सण वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावासह साजरा केला जातो. पोंगलला लोहरी, मकर संक्रांती, पोकी, बिहू आणि हादगा अशा विविध नावांनेही ओळखले जाते. उत्सव भिन्न असू शकतात, परंतु सामान्यपणे सूर्य, रथ, गव्हाचे धान्य आणि विळा या चिन्हांचा समावेश सर्वत्र असतो. पोंगल सणाच्या निमित्तानं कुटुंबे आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात. अतिशय पारंपरिकपद्धतीने साजरा होणारा हा उत्सव सामान्यांपासून सेलेब्रिटीपर्यंत एक आनंदाची पर्वणी देणारा आहे.
कामाच्या आघाडीवर अभिनेता धनुषची भूमिका असलेला 'कॅप्टन मिलर' हा तमिळ अॅक्शनर चित्रपट १२ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. संक्रातीच्या निमिततानं रिलीज झालेला हा पोंगल स्पेशल चित्रपट सणाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरला आहे. अरुण माथेस्वरन दिग्दर्शित कॅप्टन मिलर हा तमिळ अॅक्शन एंटरटेनर आहे. चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष आणि अरुण यांचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट आहे. या चित्रपटाचे कथानक ब्रिटीश कालीन भारतातील 1930-1940 च्या दशकात घडतं. मिलर नावाच्या एका डाकूचे जीवन उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रियांका मोहन, संदीप किशन, विनोथ किशन, शिवा राजकुमार, जॉन कोकेन आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे.
धनुषने अलीकडेच एका कॉन्सेप्ट पोस्टरसह तो दिग्दर्शित करत असलेल्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडिया हँडल X वर धनुषने रिलीजच्या तारखेसह एक पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये पार्श्वभूमीत विशाल निळा समुद्र असलेला बीच बेंच आहे. आकाशात दोन अर्धचंद्रासह 3 हा आकडा आणि 24. 12. 23. हा रिलीजचा आकडाही दिसत आहे. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले, "#DD3" अनेक भाषामध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता नागार्जुन अक्किनेनीही धनुषसह झळकणार आहे. हा चित्रपट शेखर कममुला दिग्दर्शित करत असून रश्मिका मंदान्ना देखील त्याचा एक भाग आहे.
हेही वाचा -
- मराठी राजकीय चित्रपट 'लोकशाही'चे पोस्टर झालं रिलीज
- अमिताभ बच्चन यांनी घर बांधण्यासाठी अयोध्येत खरेदी केली जमीन; किंमत जाणून बसेल धक्का
- वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा'मध्ये 'द आर्चीज' स्टार वेदांग रैना आलिया भट्टसोबत झळकेल