महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gadar २ vs OMG २ : वीकेंडमध्ये 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'चा झाला फायदा... - बॉक्स ऑफिस कलेक्शन

वीकेंडमध्ये सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा चित्रपट 'ओ माय गॉड 2'च्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनमध्ये थोडी वाढ झाली आहे. या वीकेंडचा फायदा दोन्ही चित्रपटांना झालाय.

Gadar 2 vs OMG 2
गदर २ आणि ओ माय गॉड २

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 12:57 PM IST

मुंबई : 'गदर 2'नं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 438.70 कोटींची कमाई केलीय. सनी देओलच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दमदार कामगिरी आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगलाच कमाई करत आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलची प्रमुख भूमिका असलेल्या 'गदर 2' नं शनिवारी, 26 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

'गदर 2'चे कलेक्शन : तारा सिंगला जगभरात पसंत केले जात असून त्यामधील डायलॉगची सर्वत्र चर्चा होत आहे. तारा सिंग आणि सकिना यांच्या कहाणीनं जगभरात कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची 16व्या दिवसाची कमाई समोर आली आहे. एका अहवालानुसार, चित्रपटाने शनिवारी 12.50 कोटींची कमाई केली आहे. गेल्या 5 दिवसांपासून 'गदर 2' च्या कमाईत घट झाली होती. मात्र आज शनिवारी चित्रपटाचे कलेक्शन मागील दिवसाच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. 'गदर 2' हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई 438.70 कोटी झाली आहे. या चित्रपटाने जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

'ओ माय गॉड 2'ची कमाई :अक्षय कुमारचा चित्रपट 'ओ माय गॉड 2' समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनाही आवडला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. या चित्रपटाने 15 दिवसांत एकूण 128.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसरीकडे, एका अहवालानुसार चित्रपटाने 16 व्या दिवशी 3.25 कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन जवळपास 131.37 कोटी झाले आहे. हा चित्रपट 150 कोटीचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करू शकणार नाही, असे सध्या दिसत आहे. अक्षय कुमारला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती. मात्र पाहिजे तशी कमाई या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली नाही.

हेही वाचा :

  1. Allu arjun And Ramcharan : रामचरण आणि उपासनाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल अल्लू अर्जुनचं केलं अभिनंदन...
  2. kriti sanon at siddhivinayak : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती सेनॉन पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात...
  3. Rajinikanth : रजनीकांतने 'जेलर'च्या क्रूसह यशाचा आनंद केला साजरा...

ABOUT THE AUTHOR

...view details