मुंबई - Sunny Deol :'गदर 2' चित्रपटातून 22 वर्षानंतर सनी देओल 'तारा सिंग'च्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकला होता. पुनरागमन करणाऱ्या सनी देओलनं पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कमबॅक केलं आहे. 'गदर 2'च्या शानदार यशानंतर सनी देओलला एकापाठोपाठ एक चित्रपट ऑफर होत आहेत. याआधी अभिनेता आमिर खाननं सनी देओलसोबत 'लाहोर 1947' या चित्रपटाची घोषणा केली होती. ही घोषणा झाल्यानंतर सनी देओलच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. दरम्यान आता सनी देओल हा 'रामायण' चित्रपटामध्ये हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.
सनी देओल ‘रामायण’ चित्रपटात झळकेल ? :दिग्दर्शक नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात हनुमानजीच्या भूमिकेसाठी सनी देओलला कास्ट करत असल्याच्या सध्या चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सनी आणि नितेशमध्ये याबाबत चर्चा झाली असून या भूमिकेबद्दल तो सकारात्मक दिसत आहे. याबद्दल अधिकृत झालेली नाही. नितीश यांना रामायण चित्रपटात सनी देओलला हनुमानजीच्या भूमिकेत पाहायचं असल्याचं बोललं जात आहे. 'रामायण' चित्रपटामध्ये जर सनी हा हनुमानजीच्या भूमिकेत झळकला तर तो थिएटरमध्ये वादळ निर्माण करेल असा अंदाज लावला जाऊ शकतो.