महाराष्ट्र

maharashtra

राजकुमार कोहलींच्या शोकसभेत सनी देओल ट्रोल, काय आहे कारण?

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 2:22 PM IST

Sunny deol : अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो राजकुमार कोहलीच्या प्रार्थना सभेत हसताना दिसत आहे.

Sunny deol
सनी देओल

मुंबई - Sunny deol :कधी कुणी सेलेब्रिटी ट्रोल हे सांगता येत नाही. असेच एका उदाहरण समोर आले आहे. सनी देओल हा राजकुमार कोहलींच्या शोकसभेतीलव्हिडिओमध्ये काही लोकांशी बोलत आहे. याशिवाय सनी हसत दिसत आहे. व्हिडिओत अरमान त्याच्यासमोर उभा आहे. या व्हिडिओवरून अनेकांनी सनी देओलला ट्रोल केलयं.

सनीनं त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याच्या 'गदर 2'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. दरम्यान 26 नोव्हेंबर रोजी राजकुमार कोहलीची प्रार्थना सभा मुलगा अरमान कोहलीनं आयोजित केली होती. या सभेत जॅकी श्रॉफ, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, सनी देओल, विंदू दारा सिंग आणि बरेच कलाकार उपस्थित होते. आता या प्रार्थना सभेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

राजकुमार कोहलीची प्रार्थना सभा : हा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण सनी देओलवर टीका करत आहेत. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका यूजरनं लिहिलं, 'हा निर्लज्जपणा आहे. मेलेल्या माणसाच्या मुलासमोर असं कोणी हसते का'. दुसऱ्या एकानं लिहिलं, 'प्रार्थना सभेत कोण इतकं कस हसू शकतं'. त्यानंतर आणखी एकानं लिहिलं, 'सनी देओल मुर्ख आणि निर्लज्ज आहे.' 'बिग बॉस 7' फेम अरमान कोहलीचे वडील राजकुमार कोहली यांचे 24 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार मुंबईत झाला, तेव्हा अनेक कलाकार उपस्थित होते. सोनू निगमनं राजकुमार यांना खांदा दिला होता. एका क्लिपमध्ये, अरमान यांनी आपल्या वडिलांचे पार्थिव धरून ठेवले होते. यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता येत नव्हते.

सनी देओलचं आगामी चित्रपट :सनी देओलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'गदर 2'मध्ये दिसला होता. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. यानंतर सनी हा 'बाप', 'सूर्या' आणि 'अपने 2', 'लाहोर 1947' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनं गिप्पी ग्रेवाल आणि सलमान खानच्या चाहत्यांना बसला धक्का
  2. विकी कौशल स्टारर चित्रपट 'सॅम बहादूर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; केली 'इतकी' कमाई
  3. जावयाचं कौतुक करत महेश भट्टनं रणबीर कपूरला म्हटलं, 'जगातील सर्वोत्तम पिता'

ABOUT THE AUTHOR

...view details