मुंबई - Sunny Deol and Vijay Sethupathi : साऊथ चित्रपट अभिनेता विजय सेतुपती आणि बॉलिवूडचा तारा सिंग उर्फ सनी देओलचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. आता हा फोटो कुठल्या प्रसंगातला आहे, हा सर्वांना प्रश्न पडत आहे. काहीजणांना असं वाटत आहे की, दोघेही आगामी चित्रपटासाठी एकत्र आले असावेत. 'जवान' चित्रपटातून विजय सेतुपतीनं रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सनी देओल आणि विजय सेतुपती खरोखरच चित्रपटात एकत्र येणार आहेत का? या फोटोची वास्तविकता काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सनी देओल आणि विजय सेतुपती फोटो व्हायरल : या फोटोमध्ये सनी देओलनं बेज कलरच्या पॅन्टखाली ऑलिव्ह कलरचा टी-शर्ट आणि ब्लेझर घातला आहे. दुसरीकडे विजयनं फोटोत काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. याशिवाय त्यानं यावर चष्मा घातला आहे. या फोटोमध्ये दोघेही देखणे दिसत आहेत. आता नुकताच 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्याची राजधानी पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे, यासाठी विजय सेतुपती त्याच्या 'गांधी टॉक्स' चित्रपटासाठी आला होता. हा चित्रपट या महोत्सवात रिलीज करण्यात आला. 'गांधी टॉक्स' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला मूक चित्रपट आहे, जो गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला.