मुंबई : बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीने नुकतेच त्याची एकुलती एक मुलगी अथिया शेट्टीचे लग्न लावले. बॉलीवूडमध्ये फ्लॉप ठरलेल्या अथिया शेट्टीने टीम इंडियाचे सलामीवीर केएल राहुलला आपला जोडीदार बनवला. 23 जानेवारी रोजी या जोडप्याने 100 विशेष पाहुण्यांमध्ये सात फेऱ्या घेतल्या आणि तिने तिच्या सुंदर जीवनाचा दुसरा अध्याय सुरू केला आहे. लग्नानंतर अथिया-राहुलवर खास मित्रांकडून करोडोंच्या भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला आणि या अनमोल भेटवस्तू दोघांना मिळाल्याची चर्चा माध्यमात जोरदार दिसून आली. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.
धोनी-कोहलीने दिल्याभेटवस्तू:अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे बोलले जात होते की, सुनील शेट्टीने मुलगी अथियाला 50 कोटींचा आलिशान बंगला भेट म्हणून दिला होता. बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने अथिया-राहुलला १.६४ कोटी रुपयांची ऑडी कार, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने २.१७ कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू, महान क्रिकेटपटू एम एस धोनीने ८० लाख किमतीची कावासाकी बाइक गिफ्ट केल्याची बातमी समोर आली आहे.