महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधील वाद संपला ; नेटफ्लिक्सवर दिसणार एकत्र - kapil sharma Show promo

Kapil Sharma And Sunil Grover : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधील वाद आता संपला आहे. हे दोघेही पुन्हा एकदा कपिल शर्मा शोद्वारे एकत्र दिसणार आहे. त्यांचा हा शो नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.

Kapil Sharma And Sunil Grover
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 5:15 PM IST

मुंबई - Kapil Sharma And Sunil Grover : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे कॉमेडी जगतातील दोन मोठे दिग्गज आहेत. आता हे दोघेही चर्चेत आले आहेत. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल आणि सुनील ग्रोव्हर एकत्र दिसत आहे. शाहरुख-सलमानच्या मदतीनं हे दोन कॉमेडी स्टार आपले मतभेद विसरून पुन्हा मित्र बनले आहेत. शनिवारी कपिल शर्मानं त्याच्या शोचा आणखी एक धमाकेदार प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा टीमसोबत दिसत आहे. या शोच्या प्रमोमध्ये कपिल - सुनीलसोबत कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंग यांच्यासह टीमचे इतर कलाकार दिसत आहेत.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर एकत्र : व्हिडीओच्या सुरुवातीला कपिल आपला परिचय देतो आणि त्यानंतर सुनील ग्रोव्हर प्रवेश करतो. कपिल म्हणतो, 'नमस्कार मित्रांनो, 'मी कपिल शर्मा आहे आणि लवकरच एक शो घेऊन येत आहे.' सुनील ग्रोवरही म्हणतो 'मी देखील नेटफ्लिक्सवर येत आहे'. त्यानंतर कपिल म्हणतो, 'आपण एकत्र जाऊया.' यानंतर कपिल म्हणतो की, '190 देशात आम्ही दिसणार आहोत'. यावर सुनील म्हणतो, ‘ऑस्ट्रेलियाला विसरून जा'. पुढं कपिल म्हणतो, 'ते आपली वाट पाहत आहेत.’ यावर सुनील म्हणतो, 'मग आपण विमानाने नको जायला. यावेळी रोडनं जाऊ'. यानंतर या शोमधील बाकीचे काही कलाकार येतात.

कपिल आणि सुनीलमध्ये झाला होता वाद :ऑस्ट्रेलियातील एक कार्यक्रम संपवून मुंबईला परतत असताना फ्लाइटमध्ये कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाला होता. आपल्या एका मुलाखतीत या वादाबद्दल बोलताना कपिल म्हटलं होतं की, 'मी सुनीलसोबत कधीच भांडलो नाही, मला इंडस्ट्रीतील सर्वोत्तम लोकांसोबत काम करायला आवडतं. जेव्हा मी 'कॉमेडी सर्कस'मध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी निर्मात्यांना सुनीलचा समावेश करण्यास सांगितलं होतं. 'हस बलिये'मध्ये मी त्याला भेटलो. जेव्हा तुम्ही मोठ्या लोकांसोबत काम करता, तेव्हा तुम्हाला खूप काही शिकायला मिळते.' कपिलचा शो यावर्षी जूनमध्ये बंद झाला आणि आता यामधील कलाकार जगभर 'लाइव्ह शो' करत आहेत.

हेही वाचा :

  1. अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकूळ, पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  2. शाहरुखनं सांगितली त्याची 'कमजोरी', फिल्मोग्राफीमध्ये 'डंकी'ला दिलं विशेष स्थान
  3. रणबीरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला 'अ‍ॅनिमल'

ABOUT THE AUTHOR

...view details