महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sukhee Movie Trailer : शिल्पा शेट्टी स्टारर 'सुखी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पाहा व्हिडिओ... - चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Sukhee Movie Trailer : शिल्पा शेट्टीच्या 'सुखी' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिल्पा ही सिंपल लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाकडून शिल्पाला खूप अपेक्षा आहेत.

Sukhee Movie Trailer
सुखी चित्रपटाचा ट्रेलर

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 7:58 PM IST

मुंबई Sukhee Movie Trailer : शिल्पा शेट्टी सध्या तिच्या आगामी 'सुखी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. 'सुखी' हा एक बॉलिवूड कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. 'सुखी' चित्रपट 22 सप्टेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. सोनल जोशी दिग्दर्शित या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत अमित साध, चैतन्य चौधरी आणि दिलनाज इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी ही 38 वर्षांची पंजाबी गृहिणी सुखप्रीत 'सुखी' कालरा हिच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते, सुखप्रीत ही तिच्या नेहमीच्या जीवनाला कंटाळलेली असते, तिला तिच्या शाळेतील 'गेट टुगेदर'मध्ये सहभागी झाल्यानंतर तिचं तारुण्य पुन्हा एकदा जागं होतं.

'सुखी'चा ट्रेलर प्रदर्शित : या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त कुशा कपिला, दिलनाझ इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सोनल जोशी यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा शर्मा यांनी केली आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर हा एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या पोस्टवर शिल्पाच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट येत आहेत. या चित्रपटासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुखप्रीतचा संघर्ष दाखवला गेला आहे.

शिल्पा शेट्टीचा वर्कफ्रंट : 'सुखी' व्यतिरिक्त शिल्पा शेट्टी ही रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजद्वारे ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा, ईशा तलवार ​​आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार दिसणार आहेत. या वेब सीरिजसाठी शिल्पा खूप उत्सुक आहे. ही वेब सीरीज अ‍ॅमेझॉन प्राइम प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. शिल्पा ही व्ही रविचंद्रन आणि संजय दत्त यांच्यासोबत 'केडी-द डेव्हिल'मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Dharmendra and Shah Rukh Khan : शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी दिल्या शुभेच्छा...
  2. Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने 1 कोटी देणगी जाहीर केल्यानंतर, 'वर्ल्ड फेमस लव्हर'च्या निर्मात्यांनी पसरला पदर, वाचा किती झालं होतं नुकसान
  3. Dream girl 2 collection day 13 : 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या तेराव्या दिवशी करू शकतो 'इतकी' कमाई...

ABOUT THE AUTHOR

...view details