महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जॅकलीन आणि नोरा फतेहीसह तीन मॉडेल अभिनेंत्रींवर सुकेश चंद्रशेखरची दौलतजादा - Nikki Tamboli and 3 others

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस फेम निक्की तांबोळी, बडे अच्छे लगते है फेम चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांनी जेलच्या आवारात सुकेश चंद्रशेखर याची भेट घेतली आणि त्याने स्वत:ची ओळख दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील निर्माता म्हणून करून दिली होती.

सुकेश चंद्रशेखरची दौलतजादा
सुकेश चंद्रशेखरची दौलतजादा

By

Published : Sep 16, 2022, 12:38 PM IST

नवी दिल्ली- करोडपती कॉनमन सुकेश चंद्रशेखर ( conman Sukesh Chandrashekhar ) याचा सहभाग असलेल्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले आहे की जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही ( that Jacqueline Fernandez and Nora Fatehi ) याशिवाय चार मॉडेल/अभिनेत्रींना पैसे आणि महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस फेम निक्की तांबोळी, बडे अच्छे लगते है फेम चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांनी तुरुंगात चंद्रशेखर याची भेट घेतली होती आणि त्याने स्वत:ची ओळख दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील निर्माता म्हणून करून दिली होती.

एका सूत्राने सांगितले की, चंद्रशेखरची मदतनीस पिंकी इराणी, जिला नंतर अटक करण्यात आली होती, तिने चंद्रशेखरसोबत त्यांच्या भेटीची सोय केली होती. या चारही अभिनेत्रींना Gucci, Versace, Louis Vuitton यांसारख्या नामांकित ब्रँडच्या महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. चंद्रशेखरने आरुषा पाटीलच्या खात्यात 5.20 लाख रुपये देखील हस्तांतरित केले होते, तिने चंद्रशेखरची भेट झाली पण जेलमध्ये भेटलो नसल्याचे म्हटले होते.

पिंकी इराणी हिने चाहत खन्नाची चंद्रशेखरशी ओळख करून दिली तेव्हा अभिनेत्रीला २ लाख रुपये आणि निळ्या रंगाचे वर्सेचे घड्याळ देण्यात आले होते. चंद्रशेखरने कथितरित्या सोफिया सिंगच्या खात्यात 2 लाख रुपये जमा केले आणि नंतर तिला एलव्ही बॅग भेट दिली. त्यानंतर तिला दीड लाख रुपये अधिक देण्यात आले होते.

चंद्रशेखरची निक्की तांबोळीशी ओळख करून देण्यासाठी पिंकी इराणीने 10 लाख रुपये घेतले आणि नंतर तिने तांबोळीला दीड लाख रुपये दिले. नंतर चंद्रशेखरने तिला गुच्ची बॅग आणि पहिल्या भेटीत 2 लाख रुपये दिले.

दरम्यान, जॅकलीन फर्नांडिसची बुधवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कथित गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. फर्नांडिसची चंद्रशेखरशी ओळख करून देणारी अभिनेत्री नोरा फतेही आणि पिंकी इराणी यांनाही गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

हेही वाचा -सोनाक्षी सिन्हाची झहीर इक्बालसोबत लपवा छपवी, पण पार्टीतील फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details