मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खानने नुकतेच शुक्रवारी रात्री मुंबईच्या रस्त्यावर आपल्या दयाळूपणाचे दर्शन दिले. हा हृदयस्पर्शी क्षण पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे अनेकजण शाहरुखच्या लेकीचे कौतुक करत आहेत.
सुहाना आणि तिची आई गौरी खान मुंबईच्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर हा प्रसंग घडला. यावेळी सुहानाने स्लीव्हलेस बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता व पायामध्ये हाय हिल्स चप्पल घातले होते. गौरी खानने पांढरा टॉप, आकर्षक पिवळा ब्लेझर, क्लासिक डेनिम्स आणि प्रिस्टिन व्हाईट हील्स घातल्या होत्या.
सुहाना आणि गौरी रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना पापाराझी त्यांना कॅमेऱ्याकडे पाहण्यासाठी आग्रह धरत होते. याच दरम्यान एका गरजू महिलेने सुहानाकडे मदतीसाठी हात पसरला. यानंतर त्या महिलेबद्दल सहानुभूती आणि दयाळूपणा दाखवत, सुहानाने तातडीने तिच्या पाकीटातून ५०० रुपयांच्या दोन नोटा काढल्या आणि त्या महिलेला दिल्या. त्या महिलेचा चेहरा लगेच कृतज्ञता आणि आनंदाने उजळलेला दिसला. ती मोठ्याने सुहानाची आभार मानताना दिसली.
हा व्हिडिओ पाहून सुहानाच्या दयाळूपणाचे व तत्पर मदतीला धावून जाण्याच्या कृतीचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. हिचे काळीज मोठे असल्याच्या अनेक प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तिच्या दातृत्वाची प्रशंसा केली आहे. तर इतर अनेकांनी तिचा स्वभाव आणि अस्सल नम्रता हायलाइट केली आहे.