मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिचा अमेरिकन बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयर याच्यासोबत एंगेजमेंट सोहळा पार पडला. यासाठी अनेक सिलेब्रिटी आणि स्टार किड्सनी हजेरी लावली होती. आलिया ही अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांची मुलगी आहे.
या एंगेजमेट कार्यक्रमात शाहरुखची लेक सुहाना खान तिचा कथित बॉयफ्रेंड अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदासोबत आला होती. सैफ अली खानचा सुपुत्र इब्राहिम अली खान तिची कथित गर्लफ्रेंड पलक तिवारीसोबत हजर होता. निळ्या रंगाच्या साडीत आलेल्या सुहाना खानने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते, तर खुशी कपूरनेही गुलाबी रंगाच्या साडीत वावरताना सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचल्या.
या साखरपुडा समारांभात आलिया आणि शेन हे जोडपे पारंपरिक ड्रेसमध्ये आकर्षक दिसत होते. यावेळी आलियाने एक सुंदर पांढरा लेहेंगा घातला होता, तर शेनने कुर्ता पायजमा सेट परिधान केला होता. त्यांचे पोशाख एकमेकांना मॅचिंग करत होते.
अनुराग कश्यपची माजी पत्नी, कल्की कोचलिन, मुलगी सफो आणि बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसह या समरंभासाठी हजर होती. आलिया एफ आणि ऐश्वर्या ठाकरे देखील या भव्य सोहळ्यात उपस्थित होत्या. यासाठी आलेली पलक तिवारी ब्रॅलेट ब्लाउज आणि बेज साडीमध्ये सुंदर दिसत होती दुसरीकडे, तिचा कथित बॉयफ्रेंड इब्राहिम काळ्या बंधगळा जॅकेटमध्ये दिसला. एंगेजमेंट पार्टीला मीझान जाफरी, राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींसह अनेक सेलिब्रिटी पाहुण्यांनी सहभाग घेतला.
एंगेजमेंट कार्यक्रमादरम्यान अनुराग कश्यप आपल्या मुलीसोबत एक हृदयस्पर्शी क्षण शेअर करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि फोटो ते दोघेही अप्रतिम दिसत होते. आलियाने याआधी इंस्टाग्रामवर शेन ग्रेगोइरला आयुष्याचा जोडीदार बनवणार असल्याची घोषणा केली होती. आलिया आणि शेनची एंगेजमेंट पार्टीमध्ये बॉलिवूड तारे तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली.