मुंबई - सुहाना खानने तिच्या अभिनय पदार्पणापूर्वीच ब्रँड एंडोर्समेंट डील मिळवली आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरियर डिझायनर गौरी खान यांची मुलगी आंतरराष्ट्रीय सौंदर्य प्रसाधने ब्रँडचा चेहरा म्हणून साइन केली आहे. जेव्हा सुहाना खानला मेबेलाइन या ब्युटी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा सोशल मीडिया युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुहानाबद्दल सोशल मीडियात प्रतिक्रिया - शाहरुख खानची ही लाडकी मुलगी मीडियात पहिल्यांदाच दिसली. एका पापाराझी अकाऊंटने सुहानाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करणारा व्हिडिओ पोस्ट करताच, सोशल मीडिया युजर्सनी याबद्दल त्यांची मते व्यक्त करण्यास सुरुवात केली. काही सोशल मीडिया युजर्सने स्टार किडला ट्रोल केले आणि चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमची चर्चा पुन्हा सुरू केली. सोशल मीडिया युजर्सनी पापाराझी व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना तिचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पाहायला मिळाले.
ब्युटी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याबद्दल आश्चर्य- काहींच्या मते, 'ब्युटी प्रोडक्टची अॅम्बेसिडर बनण्यासाठी तिने किती मेहनत घेतली आहे. एसआरके मेबेलाइनचा अॅम्बेसिडर आहे असे दिसते. तिचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही की गाणेही नाही. आता अचानक ती ब्युटी प्रॉडक्टचा चेहरा आहे. हे खूप पक्षपाती आहे.' अशा प्रतिक्रिया उमटल्या. दुसर्याने लिहिले: 'बॉलिवुडची हीच समस्या आहे.स्टारकिड्सला कोणत्याही चित्रपटाशिवाय एंडोर्समेंट डील्स मिळतात. तिने आयुष्यात काहीही मिळवले नाही. पण तरीही मेबेलाइनची ब्रँड अॅम्बेसेडर बनली.' तर आणखी एकाने लिहिले, 'तिची ओळख काय आहे?...शाहरुख खानची फक्त मुलगी...तिने काही छान केले आहे का की ज्यामुळे आम्ही सुहाना..सुहाना....असे ओरडावे.'
तिच्या मोठ्या लाँचबद्दल आणि तिला पहिल्यांदाच सार्वजनिकपणे बोलल्याबद्दल इतरांना आनंद झाला होता, तर काही लोकांनी प्रश्न केला आहे की सुहानाला तिचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अशा पेडस्टलवर का ठेवले जात आहे. न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतलेली सुहाना द आर्चीजमध्ये खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांसारख्या अनेक लेटेस्ट चेहऱ्यांसोबत दिसणार आहे.
हेही वाचा -Vani Kapoor Visits Sarnath : वाणी कपूरने सारनाथला जावून घेतले भगवान बुद्धाचे दर्शन; हे सुंदर फोटो केले शेअर