मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानची (Shah Rukh khan) लाडकी मुलगी सुहाना खान (Suhana Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच सुहाना खान अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि तिचा मुलगा अगस्त्य नंदा (Agastya Nanda) यांच्यासोबत दिसली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, सुहानाने आता तिच्या मिरर सेल्फीद्वारे चाहत्यांना खूश करण्याचे काम केले आहे.
सुहाना खानने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सेल्फी शेअर केली आहे. यामध्ये सुहानाने काळ्या रंगाचा नेकलाइन टॉप आणि डोळ्यात काजळ घातले असून तिने हलका मेकअप केला आहे. हा मिरर सेल्फी शेअर करत सुहाना खानने 'माझ्यासोबत तयार व्हा' असे लिहिले आहे.
सुहानाचे चाहते आता या मिरर सेल्फीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सुहाना खानच्या अनेक चाहत्यांनी या सेल्फीवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. सुहान खानच्या पहिल्या द आर्चीज मालिकेतील सह-अभिनेत्याने देखील मला ही कमेंट आवडल्याचे म्हटले आहे.