महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Archies gets release date : सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट 'द आर्चीज'ची रिलीज तारीख जाहीर - Agastya Nandas debut film

सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खूशी कपूर या स्टार किड्सचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी 'द आर्चीज'ची रिलीज तारीख सोशल मीडियावरुन जाहीर केली आहे.

The Archies gets release date
'द आर्चीज'ची रिलीज तारीख जाहीर

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 12:42 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार किड्सचे पदार्पण असलेल्या 'द आर्चीज' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाची अधिकृत रिलीजची तारीख जाहीर केली. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानची लेक सुहाना खान, श्रीदेवीचा मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'द आर्चीज' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर थेट बिलबोर्डसह चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली. बहुप्रतीक्षित 'द आर्चीज' चित्रपट ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की, ' 'द आर्चीज' ७ सप्टेंबरला दाखल होणार आहे.'

'द आर्चीज' हा एक नव्या युगाचे संगीत असलेला आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन यांच्या आयुष्यातील एक काव्यमय कथा असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा रिव्हरडेल या काल्पनिक डोंगराळ शहरात घडताना प्रेक्षक पाहणार आहेत.या चित्रपटातून प्रेम, मैत्री, स्वातंत्र्य आणि बंडखोरी याचा शोध चित्रपटात घेतला जाणार आहे.

जगभरात गाजलेल्या लोकप्रिय कॉमिक्सच्या भारतीय रूपांतरात आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत अगस्त्य नंदा, बेटी कूपरच्या भूमिकेत खुशी कपूर, नेहमी भुकेल्या जुगहेड जोन्सच्या भूमिकेत मिहिर आहुजा, सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत आणि युवराज मेंडा डिल्टन डोईलीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

झोया अख्तरने अलीकडेच 'द आर्चीज' चित्रपटाच्या टीझरचे लॉन्चिंग केले होते. यात दाखवण्यात आले होते की, रिव्हरडेलच्या हिल स्टेशनवर एक सुंदर ट्रेन दाखल होते. १९६४ च्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या या कथेत मुले मुली या सुंदर ठिकाणाच्या भेटीसाठी आले आहेत. संगीताच्या मधुर तालावर डोलणारी ही मुले निसर्गात मजा मस्ती करताना दिसतात. त्यांचे पार्टी करणे, मोकळे पणाने वावरणे, बंड करणे याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली होती.

या चित्रपटातील स्टार कास्ट जरी नवखी असली तरी खूप फॅन फॉलोअर्स असणारी आहे. पदार्पण करण्यापूर्वीच या स्टार किड्सना खूप लोकप्रियता मिळालेली आहे. चित्रपटाचा टीझर पाहता एक धमाल, मस्ती आणि मनोरंजन चित्रपटातून पाहायला मिळणार याची हमी निर्मात्यांनी दिल्याचे दिसते.

हेही वाचा -

१.king of kotha box office collection Day 5 : दुल्कर सलमान स्टारर 'किंग ऑफ कोठा'नं केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....

२.Jawan trailer date locked: शाहरुखने शेअर केली 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक, 'रक्षा बंधना'ला होणार मोठा धमाका

३.Subhedar first week end BO : 'सुभेदार' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात दमदार कमाई

ABOUT THE AUTHOR

...view details