महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Suhana Khan skating scene : सुहाना खाननं सांगितला 'द आर्चिज' मधील 'सुनोह' गाण्यातील स्केटिंग सीनचा किस्सा - Sunoh song from The Archies

Suhana Khan skating scene : सुहाना खान 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहे. यामधील 'सुनोह' गाणं रिलीज झाले असून यात सुहाना स्केटिंग करत असताना दिसते. याच्या शुटिंग दरम्यान तिला आलेला अनुभव तिनं कथन केलाय.

Suhana Khan skating scene
सुहाना खान स्केटिंग करत असताना

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 2:13 PM IST

मुंबई - Suhana Khan skating scene : 'द आर्चीज' या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये अभिनयात पदार्पण करत आहे. या चित्रपटातील 'सुनोह' हे गाणं अलिकडेच रिलीज करण्यात आलंय. या सुंदर गाण्यामध्ये अगदी लीलया स्केटिंग करताना सुहाना दिसतेय. झायो अख्तरनं दिग्दर्शन केलेल्या या गाण्यातील तिच्या स्केटिंग सीक्वेन्सबद्दल सुहानानं सांगितले.

शुक्रवारी सुहानानं इंस्टाग्रामवर गाण्याच्या मेकिंगचा पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केलाय. सुहानानं व्हिडिओमध्ये खुलासा केलाय की, स्केटिंग सीक्वेन्सपूर्वी ती कशी घाबरली होती. ती म्हणाली, 'मी स्केटिंग करण्यापूर्वी खरोखर थरथर कापत होते. मी इतके दिवस स्केटिंग करत असनाही मला तसं होत होतं, यामुळे मी खूपच निराश झाले होते. पण आमच्या स्केटिंग ट्रेनर म्हणाल्या चला प्रयत्न करुयात. आपण जे शिकलोय त्यातील काहीही वाया घालवू नका.'

अगस्त्य नंदा यानंही या गाण्यात छान गिटार वाजवली आहे. हा अनुभव सांगताना तो म्हणाला, 'मी गिटार, पियानो वाजवायला शिकलो आणि मी गाण्याचा प्रयत्नही केला पण त्यांनी माझा आवाज घेतला नाही.' यावर बोलताना संगीतकार अंकुर तिवारी पुढे म्हणाला की, 'अगस्त्य ऑफ की गातो.'

'सुनोह' हे गाणं गीतकार जावेद अख्तर यांनी डॉटसह रचले असून संगीतकार अंकुर तिवारी आणि द आयलँडर्स यांनी तयार केलं आहे. तेजस मेनन आणि शिवम महादेवन यांनी हे गाणं सादर केलंय. अंकुरनं या गाण्यासाठी जावेद अख्तरशी संपर्क साधण्याचा विचार का केला हे शेअर करताना म्हटले, 'आम्ही आधीच ठरवलं होतं की चित्रपटाची सुरुवात एका दमदार गाण्याच्या सादरीकरणानं करायचीय. यासाठी माझ्याकडे एकच शब्द येत होता तो म्हणजे 'सुनोह'. आणि मग आम्ही हे गाणं जावेद साहेबांकडे नेलं.'

जावेद अख्तर पुढे म्हणाले, 'माझ्याकडे जो काही शब्दसंग्रह आहे, तो मला जवळजवळ 85% विसरावा लागेल. यासाठी ते पात्र जसे बोलेल त्या भाषेत लिहिता आलं पाहिजे, माझ्या भाषेत नाही. '

जगभरातील मुलांच्यामध्ये लोकप्रिय कॉमिक्सच्या भारतीय रूपांतर असलेल्या 'द आर्चीज'मध्ये डॉट प्ले एथेल मग्स, आकर्षक आणि प्रतिभावान आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत अगस्त्य नंदा, बेटी कूपरच्या भूमिकेत खुशी कपूर, नेहमी भुकेला असलेला जुगहेड जोन्सच्या भूमिकेत मिहिर आहुजा, सुहाना खानने साकारलेली वेरोनिका लॉज, हार्टथ्रॉबची भूमिका साकारताना दिसणार आहे. रेगी मेंटल वेदांग रैना आणि युवराज मेंडा डिल्टन डोईलीची भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

1. Koffee With Karan 8 : रणवीरनं सांगितला दीपिकाच्या नैराश्येचा किस्सा, करण जोहरलाही आला होता पॅनिक अटॅक

2.Tejas Box Office Collection Day 2: कंगना रणौत स्टारर 'तेजस' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ...

3.Ananya And Aditya : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनर डेटवर झाले स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल...

ABOUT THE AUTHOR

...view details