महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सुहाना, अनन्या आणि शनायानं बेस्ट फ्रेंड नव्या नवेलीवर केला प्रेमाचा वर्षाव - अनन्या पांडे वाढदिवस शुभेच्छा

सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांनी त्यांच जवळच्या मैत्रिणी नव्या नवेली नंदा हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या या स्टार किड्सची पोस्ट पाहा.

Navya Naveli Nanda
बेस्ट फ्रेंड नव्या नवेलीवर मैत्रीणींचा प्रेमाचा वर्षाव

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 4:48 PM IST

मुंबई - सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांनी त्यांची जवळची मैत्रिण नव्या नवेली नंदा हिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावरील सुंदर पोस्ट्समधून या तिघींनी त्यांच्या अनमोल क्षणांचे थ्रोबॅक फोटो शेअर केले. अनन्या, सुहाना आणि शनाया यांनी आपली बेस्ट फ्रेंड असलेल्या नव्यासाठी लिहिलेल्या वाढदिवसाच्या या शुभेच्छांमध्‍ये बालपणापासून असलेलं त्यांचं अतुट नातं दिसून येतं.

नव्या नवेलीवर वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. 6 डिसेंबर रोजी नव्यानं तिचा वाढदिवस साजरा करत असताना, अनन्यानं इंस्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून मैत्रीणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. एका फोटोसह मनापासून संदेश दिला. अनन्यानं लिहिले, "सर्वोत्तम मुलगी! वाढदिवसाच्या शुभेच्छा माय नेव्हिल," तिनं ही पोस्ट नव्याला टॅगही केली आहे.

शनायानं बेस्ट फ्रेंड नव्या नवेलीवर केला प्रेमाचा वर्षाव

सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खाननं देखील स्वतःचा नव्या आणि अनन्याचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करून वाढदिवसानिमित्त आनंद व्यक्त केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुहानानं लिहिले, "बर्थडे गर्ल!!" नव्याला टॅग करत तिनं पोस्टचा शेवट "आय लव्ह यू" ने केला आहे.

बेस्ट फ्रेंड नव्या नवेलीवर मैत्रीणींचा प्रेमाचा वर्षाव

त्याचप्रमाणे संजय कपूर आणि महीप कपूरची मुलगी शनाया कपूरने नव्याला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इन्स्टाग्राम स्टोरीजद्वारे कळवल्या आहेत. "हॅप्पी बर्थडे बेस्टी" असं लिहित तिनं एक जबरदस्त थ्रोबॅक फोटो शेअर केला.

नव्या नंदानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर भाऊ अगस्त्यसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले होते. एक दिवस आधी हे फोटो शेअर करत तिनं लिहिलं होतं, 'उद्या आर्चीचा मोठा दिवस आहे' पहिल्या फोटोत नव्या ही अगस्त्यसोबत कॅमेऱ्याला पोझ देताना दिसतेय. दुसऱ्या फोटोत अगस्त्य आपल्या बहिणीला मिठी मारत किस घेताना दिसत आहे. याशिवाय तिसऱ्या फोटोत नव्या ही आपल्या भावाचं चुंबन घेतलंय. अगस्त्य नंदाच्या डेब्यू रिलीजपूर्वी, नव्या नंदा भावाला प्रोत्साहित केलं आहे. अलीकडेच नव्या नवेलीनं आणखी एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केले होता. या व्हिडिओत तिनं अगस्त्य 'रॉक अँड रोल'साठी कसा तयार होतो हे सांगितलं होतं. व्हिडीओमध्ये अगस्त्य हा गिटार वाजवताना दिसला होता.

हेही वाचा -

  1. 'अ‍ॅनिमल' पाहिल्यानंतर अर्शद वारसीनं केलं रणबीर कपूरचं कौतुक
  2. 'अफवाहों का 'सफर' बस यहीं तक': सनी देओलनं नशेतील व्हायरल व्हिडिओचं सांगितलं सत्य
  3. 'फायटर' चित्रपटामधील अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज ; पाहा पोस्टर

ABOUT THE AUTHOR

...view details