महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Actress Archana Mahadev : जीवनात वाट्याला आलेला संघर्ष भूमिका करताना खुप महत्वाचा ठरला - अभिनेत्री अर्चना महादेव - घोडा चित्रपट

अभिनेत्री अर्चना महादेव हिचा जन्म गावाकडचा असल्याने तिला ग्रामीण लोकांचे जगणे जवळून माहिती आहे. याचा उपयोग ती भूमिका साकारतताना करत असते. तिची मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेले 'घोडा' आणि 'मसुटा' हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील भूमिकांविषयी तिने आपली मते व्यक्त केली आहेत.

Actress Archana Mahadev
अभिनेत्री अर्चना महादेव

By

Published : Feb 10, 2023, 6:14 PM IST

मुंबई -आपल्या देशात सिनेमावर प्रेम करणारे करोडो लोक आहेत आणि त्यामुळेच सिनेसृष्टी समृद्ध झालेली आहे. प्रेक्षक म्हणून चित्रपट पाहताना अनेकांना अभिनय करावासा वाटतो परंतु काही मोजकेच त्या विचारला मूर्त स्वरूप देऊ शकतात. अशीच एक तरुणी, जी दुष्काळग्रस्त भागात लहानाची मोठी झाली, जिने अभिनयाला आपले काम मानले. अनेक कठीण प्रसंगांतून तावून सुलाखून निघत ती आता अभिनेत्री बनली आहे.

अभिनेत्री अर्चना महादेव


दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या अर्चना महादेवची मोठ्या पडद्यावर उतुंग भरारी अनेकांना प्रेरणादायी आहे. खडतर परिस्थितीवर मात करीत तिने जिद्दीने हे यश खेचून आणलं आहे. तिची मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेले 'घोडा' आणि 'मसुटा' हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. अर्चना महादेवची मुख्य भूमिका असलेल्या 'घोडा' या चित्रपटाला दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात 'बेस्ट ज्यूरी अवॉर्ड' तर 'मसुटा' या चित्रपटाला विविध महोत्सव, पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे.

अभिनेत्री अर्चना महादेव

एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी तो क्षण येतो. नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यांतून आलेल्या अर्चना महादेव या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या वाट्याला मात्र हे भाग्य आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळप्रवण भागात असलेल्या जामगाव या खेड्याची ओळख महादाजी शिंदे यांच्या वाड्यामुळे आहे. बालपणीच पितृछत्र हरवलेल्या अर्चनाचा सांभाळ आईने शिवणकाम करत केला. आईच्या कष्टाचे चीज करणाऱ्या अर्चनाने आजवर अनेक एकांकिका, नाटके आणि लघुपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. तसेच तिने पडद्यामागे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन विभागातही आपल्या कामाचा अमिट ठसा उमटवला आहे.

अभिनेत्री अर्चना महादेव

आजवरचा संघर्षमय प्रवास आणि आगामी दोन चित्रपटातील मुख्य भूमिकेत झळकण्याबद्दल बोलताना अर्चना महादेव म्हणाली, 'आपल्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर आपण गूगल वर शोधतो. पण एखादी भूमिका करायची असेल तर अभिनय करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या लोकांचा अभ्यास हा त्यांच्यासोबतच राहून करावा लागतो. साहजिकच त्यासाठी निरीक्षण ही फार महत्वाच असत. दोन्ही फ़िल्म मधील माझ्या भूमिका या फार वेगळ्या आहेत. मात्र, जन्म गावचा असल्यामुळे खऱ्या जीवनात वाट्याला आलेला संघर्ष या भूमिका करताना खुप महत्वाचा ठरला.'

अभिनेत्री अर्चना महादेव

हेही वाचा -Nargis Fakhri Exclusive : अभिनेत्री नरगिस फाकरीचा चार वर्षानंतर कमबॅक, ईटीव्ही भारतशी संवाद साधताना म्हणाली 'मला मोठ्या पडद्यावर...'

ABOUT THE AUTHOR

...view details