मुंबई- अभिनेत्री सारा अली खान ( Sara Ali Khan ) हिने तिचा पहिला सहकलाकार सुशांत सिंग राजपूतच्या ( Sushant Sing Rajput ) दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञता आणि भावनांनी भरलेली पोस्ट शेअर केली आहे. साराने तिच्या डेब्यू फिल्म केदारनाथमधील ( Film Kedarnath ) एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती सुशांतसोबत दिसत आहे. त्याच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण होऊनही मृत्यूचे कोडे नेमकेपणाने अद्यापही उलगडलेले नाही.
तिच्या इंस्टाग्राम हँडलवर साराने एसएसआरच्या स्मरणार्थ एक भावनिक पोस्ट लिहिली. केदारनाथ टित्रपटाच्या शुटिंगच्या दिवसांचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करताना, साराने लिहिले, "पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरे जाण्यापासून ते तुझ्या दुर्बिणीतून गुरू आणि चंद्र पाहण्यापर्यंतचे अनेक प्रसंग तुझ्यासोबत घडले आहेत. मला ते सर्व क्षण आणि आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद. "
साराने पुढे लिहिले, "आज पौर्णिमेच्या रात्री जेव्हा मी आकाशाकडे पाहते तेव्हा मला माहित आहे की तू तुझ्या आवडत्या तारे आणि नक्षत्रांमध्ये असशील, चमकत आहात. आता आणि कायमचे. #जय भोलेनाथ."