हैदराबाद- भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट RRR साठी मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. न्यू यॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल (NYFCC) मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात एक नवीन मानाचा तुरा लागला आहे. अवॉर्ड शोमध्ये दिग्दर्शक पत्नी रामा राजामौली, मुलगा एसएस कार्तिकेय आणि कुटुंबासह उपस्थित होते.
एसएस राजामौली यांनी प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले की, आरआरआर हा चित्रपट पाश्चिमात्य लोकांनादेखील भारतीयांप्रमाणेच आवडतो आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासाठी त्याच्या नावाची घोषणा होताच या दिग्दर्शकालाही प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. यावेळी राजामौली यांनी करड्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता.
राजामौली यांचा मुलगा एसएस कार्तिकेय याने पुरस्कार सोहळ्यातील वडिलांचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले, "सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक." फोटोंमध्ये राजामौली त्यांच्या पत्नीसह पुरस्कारासोबत पोज देताना दिसत आहेत. दिग्दर्शक आधीच सोशल मीडियावर ट्रेंड हेत आहे आणि भारताला अभिमान वाटावा यासाठी चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
आरआरआर टीम गोल्डन ग्लोबमध्ये सहभागी होणार - आरआरआर चित्रपटाची टीम लॉस एंजेलिसमध्ये गोल्डन ग्लोबमध्ये त्यांच्या नावावर आणखी एक प्रतिष्ठित पुरस्कार जोडण्यासाठी सज्ज आहे. एसएस राजामौली, त्यांचे कुटुंबीय, राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना यांच्यासह आरआरआर टीम पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. हा पुरस्कार सोहळा 11 जानेवारी 2023 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे. नाटू नाटू या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर – नॉन-इंग्रजी भाषा श्रेणी आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे, मोशन पिक्चर श्रेणी अंतर्गत या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.