मुंबई - G20 Summit: साऊथ दिग्दर्शक एसएस. राजामौली यांचा 'आरआरआर' (RRR) चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतात सुरू असलेल्या जी20 (G20) परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ यांनी अलीकडेच या चित्रपटाचे कौतुक केलं. या चित्रपटानं त्यांना मंत्रमुग्ध केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान आता यावर राजामौली यांनीही प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, 'आरआरआर' (RRR) तीन तासांचा फीचर चित्रपट आहे. या चित्रपटात अप्रतिम डान्ससोबत अनेक फनी सीन्सही दाखविण्यात आले आहेत. हा चित्रपट भारतीयांवरील ब्रिटिशांच्या सत्तेवर सखोल टीका करतो. माझा विश्वास आहे की हा चित्रपट जगभर ब्लॉकबस्टर झाला असावा...कारण माझ्याशी जो कोणी बोलतो त्याला मी म्हणतो, तू तीन तासांचा विद्रोह आणि क्रांतीवीरांवर आधारित चित्रपट पाहिला आहे का? मी दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या कलाकारांचे अभिनंदन करतो. कारण त्यांनी मला मंत्रमुग्ध केलं आहे.
एक्सवर पोस्ट झाली शेअर :ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा म्हणतात, 'माझ्याशी बोलणारी प्रत्येक व्यक्तीना विचारतो की 'आरआरआर' (RRR) तुम्ही पाहिला आहे का?' यानंतर एसएस राजामौली यांनी लुईस इनासिओचे आभार मानले. लुईझचं आभार मानताना त्यांनी म्हटलं, सर तुमच्या सुंदर शब्दांबद्दल खूप धन्यवाद. तुम्ही भारतीय सिनेमाचा उल्लेख केला. 'आरआरआर' (RRR)चा आनंद घेतला हे जाणून आनंद झाला! आमची टीम खूप आनंदी आहे. आशा आहे की तुमचा आमच्या देशात चांगला वेळ जाईल. 'आरआरआर' (RRR) या चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू (राम चरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची कथा दाखवण्यात आली होती.