महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आरआरआर’ दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाच्या ट्रेलरचे केले कौतुक!

आमिर खानचा बहुप्रतिक्षित 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. एसएस राजामौली यांसारख्या भारतीय मान्यवरांसह सर्वांनी या ट्रेलरचे कौतुक केले आहे. त्यांनी आमिरला चित्रपटाच्या यशासाठी सदिच्छाही दिल्या आहेत.

लाल सिंग चड्ढा
लाल सिंग चड्ढा

By

Published : Jun 2, 2022, 9:42 AM IST

आमिर खान अत्यंत दक्षतेने आपल्या सिनेमाची काळजी घेत असतो. त्याचा येऊ घातलेला लाल सिंग चड्ढा कोरोना अटॅकमुळे बराच रखडला होता. परंतु आमिर खान आपली नवी कलाकृती घेऊन सज्ज होत असून नुकताच त्याने लाल सिंग चड्ढाच्या ट्रेलरचे अनावरण केले. आमिरच्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे लाल सिंग चड्ढा अस्तित्वात येतोय आणि त्यामुळे नेटिझन्सच्या अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत. दशकभराची मेहनत, समर्पण आणि संयमानंतर हा चित्रपट आता आपल्या साधेपणाने आणि शांततेने प्रेक्षकांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.

आमिर खानचा बहुप्रतिक्षित 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. या ट्रेलरने अवघ्या २४ तासांत ६२ दशलक्ष व्ह्यूज मिळवले असून, लाल सिंग चड्ढाने इंटरनेटवर मेसेजेसचा धुमाकूळ घातला आहे. भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांनी अभिनंदनाचे संदेश पोस्ट केले असून ‘आरआरआर’ मेकर एसएस राजामौली यांसारख्या भारतीय मान्यवरांसह सर्वांनी या ट्रेलरचे कौतुक केले आहे. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर राजामौली यांनी लिहिले, "आमिर ४ वर्षांनंतर एका भावपूर्ण चित्रपटासह परत येत आहे. #LaalSinghCaddha चा ट्रेलर आवडला. तो नेहमी करतो तसा तो ‘रॉक’ करतोय. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यासाठी मी उतावीळ झालोय, अजून प्रतीक्षा करू शकत नाही… माझ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा”.

आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम18 स्टुडिओज निर्मित लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखवण्यात आला आणि सोमवारी अनेकांनी तो थेट पाहिला. करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

लाल सिंग चड्ढा पोस्टर

हेही वाचा -सिद्धू मुसेवालाच्या हत्येत लॉरेंस बिश्नोईचे नाव समोर येताच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details