मुंबई Animal Movie : रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर अॅक्शन थ्रिलर 'अॅनिमल' चित्रपटगृहात लवकरच दाखल होणार आहे. 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि बॉबी देओल आज 27 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये असेल. याशिवाय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होणाऱ्या कार्यक्रमात निर्माते एसएस राजामौली आणि सुपरस्टार महेश बाबू हे प्री-रिलीझ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. टी-सीरीजनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी प्रमुख पाहुण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'अॅनिमल' गर्जना करण्यास तयार आहे. काही ठिकाणी गर्जना होऊ शकते. एक व्यक्ती आपल्या प्रतिभेनं जगासोबत गर्जना करू शकतो. एसएस राजामौली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत'.
'अॅनिमल' चित्रपटाचं प्रमोशन : दुसर्या पोस्टमध्ये त्यांनी महेश बाबूबद्दल लिहिलं, सुपरस्टार महेश बाबू हे 'अॅनिमल' प्री-रिलीझ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.' संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अलीकडेच, चेन्नईमध्ये एक प्रमोशनल इव्हेंट झाला होता. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी 'अॅनिमल'चा ट्रेलर प्रदर्शित केला होता. ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 3 मिनिट 32 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये रणबीर हा हिंसक दिसला आहे. रणबीरचे पात्र या चित्रपटामध्ये वडिलांवरील प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला धमकावताना दिसते.