मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान २५ जानेवारीला पठाण या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतणार आहे. चार वर्षांनंतर शाहरुखचे कमबॅक होणार असल्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट खूप प्रतिष्ठेचा आहे. शाहरुखच्या कट्टर चाहत्यांना पठाण मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार असला तरी ज्यांना चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची इच्छा नाही त्यांना पठाण OTT वर येण्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
पठाणच्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने निर्मात्यांना दृश्य आणि श्रवणदोष असलेल्यांच्या फायद्यासाठी पठाण ओटीटी रिलीजसाठी हिंदी सबटायटल्स, क्लोज्ड कॅप्शन्स, तसेच ऑडिओ वर्णन प्रदान करण्यास सांगितल्यानंतर पठाण OTT रिलीजची तारीख आधीच मोठी बातमी बनली आहे.
शाहरुखचा बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर पठाण 25 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल. परंतु त्याआधी, न्यायालयाने निर्मात्यांना चित्रपटाच्या OTT रिलीजसाठी काही बदल करण्यास सांगितले आहेत. पठाणला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने यापूर्वीच मान्यता दिली आहे. परंतु न्यायालयाने सुचविल्याप्रमाणे, निर्मात्यांनी सबटायटल्स तयार केल्यानंतर निर्मात्यांना ते 20 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा प्रमाणीकरणासाठी CBFC कडे सादर करावे लागेल.