मुंबई- आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या पौराणिक साय-फाय ड्रामा ब्रह्मास्त्र ( Brahmastra ) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपट निर्माता अयान मुखर्जीने ( Ayan Mukerji ) सिनेफिलर्सची उत्सुकता वाढवली आहे.
ट्रेलर लॉन्चनंतर, सुपरस्टार शाहरुख खान या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याची जोरदार चर्चा होती. जूनमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी ट्रेलरमधील स्क्रीनशॉट शेअर केले आणि आश्चर्य झाले की हा तर वायुच्या रुपातील किंग खान आहे आणि आता असे दिसते घारीची नजर बाळगणाऱ्या चाहत्यांनी केलेले निरीक्षण योग्य आहे.
गुरुवारी नेटिझन्सनी ब्रह्मास्त्रमधील एसआरकेचा लूक असल्याचा दावा करत एक नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. व्हायरल क्लिपमध्ये शाहरुख रक्ताने माखलेल्या अवतारात दिसत आहे. जसजसे शाहरुखचे पात्र हवेत उंचावते तसतसे भगवान हनुमानाची आकृती दिसू लागते.