महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

FIFA 2022 : शाहरुख ते मामुट्टीपर्यंत सिने सिलेब्रिटींनी साजरा केला अर्जेंटिनाचा विजयोत्सव - सुपरस्टार मोहनलाल

अर्जेंटिनाने 1986 नंतर त्यांचे पहिले वर्ल्ड कप विजेतेपद जिंकले. अर्जेंटिनाला वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील टामचे कौतुक केले.

FIFA 2022
FIFA 2022

By

Published : Dec 19, 2022, 2:09 PM IST

मुंबई- फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर शानदार विजय मिळविला, त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. लिओनेल मेस्सी आणि त्याच्या टीमचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय सेलेब्रिटींनी सोशल मीडियाचा आसरा घेतला.

ट्विटरवर, शाहरुख खानने त्याच्या बालपणापासूनच्या विश्वचषकाच्या गोड आठवणींना उजाळा दिला आणि मेस्सीच्या 'प्रतिभा आणि कठोर परिश्रमाबद्दल' त्याचे कौतुक केले.

त्याच्या पठाण चित्पटातील बेशरम रंग गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे न घाबरता, शाहरुख खान FIFA वर्ल्ड कप ब्रॉडकास्टर, स्पोर्ट्स 18 च्या स्टुडिओमध्ये इंग्लिश फुटबॉल लीजेंड वेन रुनीसोबत नाचतानाही दिसला.

क्रिकेट-वेड्या केरळचे दोन सुपरस्टार मोहनलाल आणि मामूट्टी यांनी स्टेडियममध्ये हजर राहून सामन्याचा आनंद घेतला. अखेरच्या क्षणापर्यंत थरारक झालेल्या या सामन्याच्या विजयानंतर दोघांनीही अर्जेंटिनाचे अभिनंदन केले.

मामूट्टीचा मुलगा आणि अखिल भारतीय स्टार दुल्कर सलमानने ही हा सामना तितकाच एन्जॉय केला. त्याने मेस्सी आणि एमबाप्पे यांचा फोटो पोस्ट करुन लिहिले, "आजची रात्र वेडे होण्यासाठी होती! अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स. मेस्सी विरुद्ध एमबाप्पे. सर्वोत्तम संघाचा विजय."

प्रिती झिंटाही घरूनच सामना पाहत होती. तिने शेवटी ट्विट केले: "ओएमजी! काय खेळ आहे! किती आश्चर्यकारक फायनल आहे. #मेस्सी मला तुझ्यासाठी हे हवे होते. अर्जेंटिना चांगला खेळला. फ्रान्सला शुभेच्छा!"

तामिळ चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनताराने मेस्सीवर तितकेच प्रेम केले. "काय फायनल! मग डिएगो मॅराडोना आणि आता लिओनेल मेस्सी," तिने ट्विट केले. तिचा नवरा, निर्माता-दिग्दर्शक विघ्नेश शिवन, उत्साही होता. त्याने आपला आनंद ट्विटरवरुन व्यक्त केला.

रणदीप हुड्डा, मेस्सीचा आणखी एक निस्सीम चाहता, ट्विट केले: "मेस्सी-आह!!!! आयुष्यभर स्वप्न पाहणे आणि उच्च स्तरावर कामगिरी करणे!! शेवटी बक्षीस मिळाले!! एक परीकथा एक शानदार कारकीर्द संपली. चांगले खेळले #एमबाप्पे तू चमकलास ताऱ्यासारखे. काय अंतिम आहे."

सुपरस्टार मोहनलाल त्याच्या उत्साहाला आवर घालू शकला नाही: "लुसेल स्टेडियममध्ये, टायटन्सच्या संघर्षाचे साक्षीदार होण्यासाठी आणि जगातील आवडत्या वेडेपणाचा भाग घेण्यासाठी जगासोबत सामील होत आहे! तुमच्या सर्वांप्रमाणेच सर्वोत्कृष्ट खेळाडूंकडून एक अभूतपूर्व आणि मनोरंजक खेळाची वाट पाहत आहे!"

हेही वाचा -दीपिका आणि रणवीर सिंगने श्वास रोखून पाहिला विश्वचषकाचा रोमांचक थरार

ABOUT THE AUTHOR

...view details