मुंबई - प्रतीक्षा अखेर संपली! या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सचे रुपेरी पडद्यावर पुनरागमन होणार आहे. सुपरस्टार शाहरुख खानपासून ते फरदीन खानपर्यंत अनेक अभिनेते दीर्घ विश्रांतीनंतर त्यांच्या अभिनयाने तुम्हा सर्वांना आकर्षित करण्यासाठी परतण्याच्या तयारीत आहेत. 2023 मध्ये ज्या कलाकारांचे पुनरागमन होणार आहे यांवर एक नजर टाकूयात.
1. शाहरुख खान
2018 मध्ये 'झिरो'मध्ये शेवटचा दिसलेला सुपरस्टार शाहरुख खान 'पठाण' या चित्रपटाद्वारे चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत एसआरके अॅक्शन-पॅक अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पठाण' व्यतिरिक्त त्याचे आणखी दोन मोठे 'जवान' आणि 'डंकी' हे चित्रपटही २०२३ मध्ये रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत.
2. फरदीन खान
जवळपास 11 वर्षांनंतर, अभिनेता फरदीन खान विस्फोट द्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारे आहे. हा चित्रपट व्हेनेझुएलाच्या रॉक पेपर सिझर्स (२०१२) चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे, जो 85 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेसाठी व्हेनेझुएलाचा प्रवेश होता. हा चित्रपट कुकी गुलाटी दिग्दर्शित करत असून यात रितेश देशमुखचीही भूमिका आहे. फरदीन शेवटचा 2010 मध्ये दुल्हा मिल गया या चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने सुष्मिता सेनसोबत काम केले होते.
3. अनुष्का शर्मा
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी हे वर्ष खास आहे कारण ही अभिनेत्री ४ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. झिरोमध्ये शेवटची दिसलेली अनुष्का नेटफ्लिक्स प्रोजेक्ट 'चकडा एक्सप्रेस'चे लीड करताना दिसणार आहे. प्रॉसिट रॉय दिग्दर्शित चकडा एक्सप्रेस हा माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स बायोपिक आहे, जो केवळ नेटफ्लिक्सवर प्रवाहित होईल. क्रिकेट खेळण्याचे तिचे एकमेव स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगणित अडथळ्यांना न जुमानता ही वेगवान गोलंदाज कसा संघर्ष करते हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. झुलनने भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि देशातील महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंसाठी ती एक आदर्श आहे. 2018 मध्ये, तिच्या सन्मानार्थ भारतीय टपाल तिकीट जारी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एका महिलेने सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम तिच्या नावावर आहे. वामिकाला जन्म दिल्यानंतर अनुष्काचा हा पहिलाच चित्रपट आहे.
4. हेलन
मधुर भांडारकरच्या हिरोईनमध्ये दिसल्यापासून ज्येष्ठ अभिनेत्री हेलन रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 2023 हे वर्ष वेगळं असणार आहे कारण तुम्ही तिला अभिनय देवच्या 'ब्राऊन'मधून पुनरागमन करताना पाहू शकता, ज्यात करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका अभिक बरुआ यांच्या सिटी ऑफ डेथ या पुस्तकावर आधारित आहे.
हेही वाचा -शाहरुखचे ३, सलमान आणि रणबीरचे २ यासह 2023 मधील 10 सर्वाधिक अपेक्षित चित्रपट