मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान तामिळ चित्रपट निर्माता अॅटलीच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. 'जवान' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात नयनताराही मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख आणि टीम जवान यांनी अलीकडेच चेन्नईमधील चित्रपटाचे शुटिंग शेड्यूल गुंडाळले आहे. त्यानंतर साऊथचे दिग्गज सुपरस्टार रजनीकांत, विजय सेतुपती आणि विजय यांनी त्यांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.
एसआरके आणि अॅटलीने जवान शेड्यूल पूर्ण केल्यावर, शाहरुखने चेन्नईमधील त्याचे 30 दिवस कसे होते हे ट्विटरवर शेअर केले आहे. त्याने लिहिलंय, "30 दिवसांचा धमाका RCE टीम! थलायवाने आमच्या सेटवर आम्हाला आशीर्वाद दिला... नयनतारासोबत चित्रपट पाहिला आणि अनिरुध्द, विजय सेतुपती यांच्यासोबत सखोल चर्चा केली आणि विजयसोबत स्वादिष्ठ भोजनाचा आनंद लुटला."
अभिनेत्याने त्याच्या जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली आणि त्याची पत्नी कृष्णा प्रिया यांचे आदरातिथ्याबद्दल आभार मानले. "अॅटली सर आणि प्रिया तुमच्या आदरातिथ्यासाठी आता चिकन 65 रेसिपी शिकण्याची गरज आहे!" त्याच्या लेटेस्ट ट्विटनुसार, SRK ने तामिळनाडूमध्ये जवानसाठी शूटिंग करताना चांगला वेळ घालवला होता, जिथे त्याचे तामिळ चित्रपट उद्योगातील दिग्गजांनी जोरदार स्वागत केले.