मुंबई : महिला दिनाची संकल्पना म्हणजे या दिवशी छोट्या छोट्या कार्यक्रमातून सर्व महिलांना त्यांच्यातील गुणांची जाणिव करून देणे हे महत्वाचे काम असते. तसेच, आपल्या विषयात ज्यांनी उल्लेखनीय कामे केले आहेत, त्यांना सन्मानित करून त्यांना एक बळ देण्याचे काम करणे गरजेचे आहे. महिलांनी आणखी उल्लेखनीय कार्य करावे असे प्रोहत्सान देणेही गरजेचे आहे अस म्हण स्मिता ठाकरे यांनी दिलखूलास गप्पा मारल्या आहेत.
आजही महिला सशक्तीकरणाचा नारा लावला जातो. मात्र आजही महिला सशक्त नाहीत का ? : मला वाटत बऱ्याच महिला सशक्त आहेत. मात्र, ग्रामीण भागातील महिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरात मोठ्या प्रमाणात महिला सशक्तीकरणाकडे वळल्या आहेत. त्या महिलांनी ग्रामीण भागातील महिलांकडे जास्त लक्ष देण्याचे काम करायला हवे. ग्रामीण भागात लक्ष दिल्यास सर्वत्र महिला सशक्त होतील.
अहवालानूसार संशोधन करणाऱ्या महिलांचे प्रमाण समान होते ते 15 टक्के झाले आहे त्यावर काय सांगाल ? : मला आकडेवारींवर विश्वास नाही. माझ्या अजूबाजूला जे बघते त्यावरून मला वाटते की या आकड्यांवर विश्वास ठेवण्यासारखे नाही. मात्र, हे आकडे जर काही सांगत असतील तर त्यावर काम करणेही गरजेचे आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात वाव मिळायला हवा. पंतप्रधानांनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून काम केले तर हा आकडाही चांगला दिसेल.
महिलांच्या प्रगतिच्या आड पुरुषी मानसिकता येते का? : शेवटी प्रत्येक घरावर अवलंबून असेत. पुरुष आणि महिला हे काही युद्ध नाहीये. आता कित्येक ठिकाणी पुरुष महिलांना प्रत्येक कामात मदत करतात. शहरात प्रामुख्याने हा भेद आज दिसत नाही. ग्रामिण भागात शिक्षणाचा अभाव असल्याने हा भेद आहे. ग्रामीण भागात जावून याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.