मुंबई - Vijay Thalapathy Film Leo : विजय थलपथीचा आगामी 'लिओ' हा चित्रपट भव्य प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 'लिओ' हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी जगभरात झळकणार आहे. हा चित्रपट यूकेमध्ये कोणतेही कट न करता प्रदर्शित केला जाणार आहे. लोकेश कनागराज लिखित आणि दिग्दर्शित, 'लिओ' हा एक अॅक्शन थ्रिलर आहे चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये थलपथी विजय जबरदस्त भूमिकेत दिसेल. तसंच या चित्रपटामध्ये संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, गौतम मेनन, मायस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकेश कनागराजसोबत रत्ना कुमार आणि धीरज वैद्य यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
युनायटेड किंगडममध्ये अॅडव्हान्स बुकिंग सुरू :सध्या 'लिओ'ची रिलीज तारीख जवळ येत असताना, युनायटेड किंगडममध्ये 7 सप्टेंबरपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. अवघ्या 5 दिवसांत या चित्रपटानं 1 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हे कलेक्शन रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनचं आहे. यापूर्वी परदेशात विजयच्या कोणत्याही चित्रपटाचं आगाऊ बुकिंग नव्हतं. यावेळी पहिल्यांदा असं होत आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त देखील धमाल करताना दिसणार आहे. यापूर्वी संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा या चित्रपटामधील फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. संजयचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.