मुंबई- अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा शाही विवाह सोहळ जैसलमेरच्या सुर्यगढ पॅलेसमध्ये ७ तारखेला पार पडला. या विवाह सोहळ्या बॉलिवूड सेलेब्रिटी हजर होते त्यांची चर्चा आपण यापूर्वी बातम्यांमधून केली होती. या विवाहास केवळ बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सही हजर होते. नुकतात मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने निर्माता करण जोहरसोबतचा सिड कियाराच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. यावरुन या नेत्रदिपक विवाहास इतरही सेलेब्रिटी हजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फिल्म पर्सनॅलिटी श्रीदेवी श्रीधर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या फोटोत पृथ्वीराज सुकुमारन पत्नी सुप्रियासह करण जोहरसोबत पोज देताना दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये श्रीदेवी श्रीधर यांनी लिहिलंय की, 'पाहा सिद्धार्थ कियाराच्या लग्नात कोण हजर होते! पृथ्वीराज सुकुमारन पत्नी सुप्रियासह करण जोहरसोबत पोज देत आहे.'
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील राम चरण याने लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या होत्या. लग्नाच्या गाठी स्वर्गातून बांधल्या जातात अशा अर्थाचे वाक्य वापरत त्याने शुभेच्छा दिल्या होत्या. राम चरणची पत्नी उपासना हिनेही नव दांपत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राम चरण आणि कियारा अडवाणी आगामी चित्रपटात एकत्र काम करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर करणार आहेत. राम चरण व महेश बाबू या साऊथ स्टार्सनाही सिड कियाराच्या लग्नासाठी आमंत्रण होते. मात्र शुटिंगचे आधी ठरलेली कमिटमेंट्स असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. महेश बाबूसोबत कियाराने भारत अने नेनू या तेलुगु चित्रपटात स्क्रिन स्पेस शेअर केली होती. त्यामुळे तिचे उत्तम नाते सुपरस्टार महेश बाबूसोबत आहेत.