महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

south Actor Brahmanandam : दाक्षिणात्य अभिनेता ब्रह्मानंदम यांनी भाजप नेते के सुधाकर यांच्यासाठी केला प्रचार - अभिनेता कॉमेडियन ब्रह्मानंदम मंत्री सुधाकर सपोर्ट

दक्षिण चित्रपट उद्योगातील अभिनेता-कॉमेडियन ब्रह्मानंदम यांनी भाजप नेते के सुधाकर यांच्या समर्थनार्थ कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी चिक्कबल्लापूर येथे प्रचार केला.

south Actor Brahmanandam
ब्रह्मानंदम यांनी भाजप नेते के सुधाकर यांच्यासाठी केला प्रचार

By

Published : May 5, 2023, 10:08 AM IST

हैदराबाद :कर्नाटक विधानसभा निवडणुक 2023च्या संदर्भात राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी ताकदीने प्रचार व प्रसार सुरू केला आहे. स्टार प्रचारक असोत की चित्रपटसृष्टीतील चमकणारे तारे, पक्ष कोणतीही प्रसिद्धी करण्यासाठी मागे राहत नाहीत. कर्नाटकातील निवडणुकीची रणधुमाळी जसजशी तीव्र होत आहे, तसतशी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी विरोधकांवर विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. याच क्रमाने, दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि कॉमेडियन ब्रह्मानंदम यांनी भारतीय जनता पक्षाचे मंत्री सुधाकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून भाजपचा प्रचार केला.

चित्रपट कलाकारही प्रचारासाठी रस्त्यावर : मतदारांना आकर्षित करण्यासाठी चित्रपट कलाकारही रस्त्यावर उतरले आहेत. त्यापैकी एक म्हणजे टॉलीवूडचा लोकप्रिय विनोदी अभिनेता ब्रह्मानंदम, ज्यांनी आता कन्नड राजकारणात प्रवेश केला आहे. ब्रह्मानंदम यांनी नुकतेच चिकबल्लापूर येथील भाजप उमेदवार सुधाकर यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला. जेथे मतदारसंघातील अनेक तेलुगू भाषिकांची उपस्थिती पाहता त्यांनी तेलुगूमध्ये लोकांशी संवाद साधला. अभिनेत्याने आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांना पाठिंबा दिला. त्यांच्यासाठी चिकबल्लापूरमध्ये प्रचार केला.

ब्रह्मानंदम यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी :तेलगू कॉमेडियन ब्रह्मानंदम यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत विनोदी कलाकाराने लोकांशी गमतीशीरपणे संवाद साधला. विशेष म्हणजे गेल्या वेळीही ब्रह्मानंदम यांनी मंत्री सुधाकर यांचा प्रचार केला होता. याआधीही चिक्कबल्लापूर विधानसभा मतदारसंघात अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी मंत्री सुधाकर यांचा प्रचार केला आहे. अभिनेते घरोघरी जाऊन मंत्री सुधाकर यांच्या प्रचारात व्यस्त आहेत.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :दाक्षिणात्य अभिनेते ब्रह्मानंदम यांचे नाव भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कॉमेडियनमध्ये घेतले जाते. आज विलासी जीवन जगणाऱ्या ब्रह्मानंदम यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. ब्रह्मानंदम अजूनही तरुण अभिनेत्याला लाजवेल अशा उत्साहाने चित्रपटांमध्ये काम करत आहेत. ब्रह्मानंदम यांच्या नावाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 1000 हून अधिक चित्रपट करणारे अभिनेते म्हणून झाली आहे. ब्रह्मानंदम यांनी आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा :Met gala 2023 : मेगा फॅशन इव्हेंट मेट गालानंतर देसी गर्ल झळकली रोम-कॉम लव्ह अगेनच्या प्रीमियरला...

ABOUT THE AUTHOR

...view details