मुंबई - करवा चौथच्या निमित्ताने उत्तर भारतातील अनेक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असताना बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपी, पंजाब, बिहारमध्ये अशा महिलांसाठी केंद्रे सुरू करण्याबद्दल पुढाकार घेणार आहे. सोनू नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी धावून येत असतो, याची प्रत्यय कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर आला होता.
आता भारतातील महिलांसाठीच्या या खास सणानिमित्त तो त्यांच्यासाठी पुढे आला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मला ही केंद्रे आता काही काळासाठी उघडायची होती. या महिलांना स्वत:ला सक्षम करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याची कल्पना आहे. देशाच्या प्रगतीसाठी आणि महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी सक्षम असणे खूप महत्त्वाचे आहे. "