मुंबई : बी-टाऊनमध्ये पुन्हा एकदा शहनाई वाजली आहे. लव रंजन दिग्दर्शित 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेगल ही विवाहबंधनात अडकली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या ३४ व्या वर्षी तिचा प्रियकर आशिष सजनानीसोबत लग्न केले आहे. हा एक खाजगी समारंभ होता ज्यामध्ये अभिनेत्रीच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवार उपस्थित होता. गेल्या सोमवारी सोनालीच्या मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. मेहंदी सेरेमनीच्या कार्यक्रमात काही खास लोकच यावेळी उपस्थित होते. या अभिनेत्रीचे लग्न आज मुंबईत दुपारी झाले. विशेष म्हणजे सोनल्ली आणि आशिष गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर कोण आहे आशिष सजनानी आणि सोनल्लीला तो कुठे भेटला हे जाणून घेण्यासाठी वाचा संपुर्ण बातमी...
सोनाली सेगलचा वर कोण आहे? :मीडिया रिपोर्ट्सवर सोनालीला तिचे लग्न हे मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवायचे होते. त्यामुळेच सोनाली आणि आशिषने अद्याप त्यांच्या नात्याची पुष्टी केली नव्हती. दुसरीकडे, आशिषबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या इन्स्टा बायोवरून असे दिसून येते की तो एक उद्योजक आहे. त्याचे हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रक डॅडी, क्लासिक कारांचा उद्योग आहे. याशिवाय त्याची ओपा नावाची स्वतःची हॉस्पिटॅलिटी फर्म आहे.