महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 Updates: 'बिग बॉस 17'मध्ये होणार आता धमाका ; प्रोमो झाला व्हायरल... - सलमान खान

Bigg Boss 17 Updates: टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17' हा जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये दोन वाईल्ड कार्ड एन्ट्रीसह एका सदस्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय 'बिग बॉस'मध्ये सलमान खानसोबत सोहेल आणि अरबाज खान देखील दिसणार आहेत.

Bigg Boss 17 Updates
बिग बॉस 17 अपडेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 3:04 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 Updates: टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17'चा दुसरा वीकेंड का वार 28 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. या शोमध्ये सलमान खानसोबत सोहेल आणि अरबाज खानही दिसले, त्यानंतर एक मोठी घोषणाही करण्यात आली होती. दुसऱ्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान विकी जैन, अंकिता लोखंडे, ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांना फटकारताना दिसत आहे. दरम्यान आता या शोमध्ये दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आल्या असून एका सदस्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. सोनिया बन्सलची घरातून हकालपट्टी झाली आहे. आता 'बिग बॉस 17' च्या मेकर्सनी एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री : काल 'वीकेंड का वार'मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकानं प्रवेश केला होता. 18वा स्पर्धक म्हणून सलमाननं मनस्वी ममगाईच्या नावाची घोषणा केली. धमाकेदार नृत्य सादरीकरणासह मनस्वी शोमध्ये प्रवेश केला. याशिवाय आणखी एक वाइल्ड कार्ड स्पर्धक शोमध्ये येणार आहे, जो आज म्हणजेच रविवारच्या 'वीकेंड का वार'मध्ये येईल. हा स्पर्धक अभिनेता समर्थ जुरेल आहे, जो ईशा मालवीयाचा कथित बॉयफ्रेंड आहे. समर्थ हा प्रोमो व्हिडिओमध्ये ईशाचा बॉयफ्रेंड असल्याचा दावा करत आहे. समर्थ तिचा बॉयफ्रेंड असल्याचं ती प्रोमो व्हिडिओमध्ये नाकारताना दिसत आहे.

कृष्णा अभिषेक करणार 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश :यासोबतच अरबाज खान आणि सोहेल खानही वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांसोबत बोलताना दिसत आहे. यासोबतच कृष्णा अभिषेकही शनिवारच्या एपिसोडमध्ये 'खबरी दादी' म्हणून प्रवेश करत आहे. तो सलमानसोबत 'चुनरी चुनरी' गाण्यावर डान्स करणार आहे. याशिवाय, ज्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे, तो थेट बाहेर जाणार नाही, तो 'खबर दादी'च्या घरी जाईल आणि तिथल्या सर्व गोष्टी तिच्यासोबत शेअर करेल.

सलमान खाननं अंकिता आणि विकी जैन यांच्यावर केली टीका : सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा चांगलाच क्लास घेतला. भाईजान अंकिताला म्हटलं, 'तू इथे आपली छाप पाडायला आली आहेस की सगळं संपवायला आली आहेस?' यासोबतच सलमाननं विकी जैनला तिखट प्रश्नही विचारले.

हेही वाचा :

  1. Deepika Padukone Halarious Video : दीपिका पदुकोण दिलं ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर; व्हिडिओ झाला व्हायरल...
  2. Tejas Vs 12th Fail Box Office Clash: कंगना राणौतचा 'तेजस'च्या कमाईचा वेग मंदावला, 'ट्वेल्थ फेल' सिनेमाला समीक्षकांची पसंती
  3. kangana Ranaut Tejas : 'तेजस' पाहण्यासाठी कंगनानं चाहत्यांना थिएटरमध्ये जाण्याचे प्रेक्षकांना केलं आवाहन...

ABOUT THE AUTHOR

...view details