मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. इटलीमध्ये 'बेबीमून' एन्जॉय करणारी सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा आता मायदेशी परतले आहेत. आज ती आपला वाढदिवस उत्साहाने साजरा करीत आहे. मंगळवारी तिने सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या पतीसोबतचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे.
सोनमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पती आनंद आहुजासोबतचा एक सुंदर व्हिडिओ टाकला, ज्यामध्ये तिने लिहिले, "घरी परतली आहे.. वाढदिवसाचा आठवडा सुरू होत आहे!"
चाहत्यांनी या जोडप्यावरील त्यांचे प्रेम हार्ट इमोटिकॉनसह भरपूर कमेंट्सचा वर्षाव करुन व्यक्त केले आहे. सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या सोशल मीडिया हँडलवर वारंवार तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना फोटो आणि व्हिडिओज अपडेट करत असते.