मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता. खरं तर, एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सोनाक्षीचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालने सोनाक्षीसाठी आय लव्ह यू असं लिहिलं होतं... त्यानंतर सोनाक्षीनेही रिप्लाय करताना लव्ह यू असं लिहिलं होतं. या पोस्टनंतर सोनाक्षी आणि झहीरचे नाते पक्के झाले असून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना वेग आला आहे. आता सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या या अफवांवर आपले मौन सोडले आहे. सोनाक्षीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून सर्व काही स्पष्ट केले आहे. पण काहींना अजूनही हा व्हिडिओ पाहून गोंधळ उडल्याचे दिसत आहे.
सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका खोलीत बसलेली दिसत आहे. या व्हिडीओसोबत तिने लिहिले आहे की, 'मी मीडियाला विचारते, तुम्ही माझ्या लग्नाच्या मागे का हात धुवून लागला आहात?' मग सोनाक्षी मीडिया बनून शाहरुखच्या आवाजातील डायलॉग म्हणते, , 'अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है." या रीलच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षीने मीडियाला उद्देशून लिहिलंय, 'प्रपोजल, रोका, मेहंदी, संगीत सब फिक्स कर ही लिया हो तो प्लीज मुझे बता दो'.
सोनाक्षीच्या व्हिडिओवर झहीर इक्बालची प्रतिक्रिया- सोनाक्षीच्या या व्हिडिओवर अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालची कमेंटही आली आहे. इक्बालने खूप हसणारे इमोजी शेअर केले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स हसत आहेत. एका युजरने लिहिले, 'बहुत क्यूट सोना...' तर दुसऱ्याने अभिनेत्रीला फटकारले आणि लिहिले, 'मॅडम कृपया मला सांगा की हा कोणत्या चित्रपटातला आणि कोणत्या सीनचा डायलॉग आहे'.