मुंबई - बॉलिवूडची 'लेडी दबंग' सोनाक्षी सिन्हा हिचे प्रेम अखेर जगजाहीर झाले आहे. सोनाक्षीचे नाव अभिनेता झहीर इक्बालसोबत खूप चर्चेत आहे. दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. पण कथित जोडपे कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोललेले नाहीत. मात्र आता दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे दिसत आहे. कारण झहीर इक्बालच्या एका पोस्टने या जोडप्याच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा केला आहे. या पोस्टमुळे सोनाक्षी सिन्हा सिंगल नसल्याचे सिद्ध झाले आहे.
झहीर इक्बालचा पोस्टमधून खुलासा - झहीर इक्बालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. झहीर इक्बालने सोनाक्षीसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा... मला न मारल्याबद्दल धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो, येणाऱ्या काळात आपण असेच खाऊ, प्रेम करू आणि हसत राहू. या पोस्टसोबत झहीरने 'आय लव्ह यू' असे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. या पोस्टमुळे झहीरने आपले रिलेशन अधिकृत करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.
सोनाक्षीने झहीर इक्बालची पोस्ट पाहताच तिला स्वतःला रोखता आले नाही. या पोस्टला उत्तर देताना अभिनेत्रीने लिहिले की, 'धन्यवाद.. तुझ्यावर प्रेम करते आणि आता मी तुला मारायला येत आहे.' इतकेच नाही तर खुद्द सोनाक्षीनेही झहीरच्या या पोस्टवर 'लव्ह यू' म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. झहीरच्या या पोस्टवर पत्रलेखा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण शर्मा, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रेम व्यक्त केले आहे.