मुंबई - The Archies Celebrity Review : झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' हा बहुप्रतिक्षित चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याआधी निर्मात्यांनी एक भव्य प्रीमियर आयोजित केला होत. यामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि करण जोहर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरणात स्टार-स्टडेड फील होता. चित्रपट पाहिल्यानंतर कतरिना कैफ आणि करण जोहरसह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चित्रपटाबद्दलचे विचार व्यक्त केले.
उत्सुक दर्शकांमध्ये अपेक्षा निर्माण होत असताना 'द आर्चीज' संबंधीचे रिव्ह्यू पहिल्यांदा समोर आला आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने बुधवारी इंस्टाग्रामवर 'द आर्चीज'च्या संपूर्ण टीमचे कौतुक करणारी एक लांबलचक चिठ्ठी लिहिली. त्याने लिहिलं, "द आर्जिज पाहिला!!! रिव्हरडील नावाचे अँग्लो इंडियन्सचे एक शहर! वर्ष आहे 1964.. आणि क्रेडिट रोलमधून तुम्ही थेट झोया अख्तरच्या जगात आणि तिच्या कलाकुसरीनं आणि कमांडने ती बनवली आहे. तुम्ही हुक आहात याची खात्री आहे!" चित्रपटातील कलाकारांचे तसेच वेशभूषा आणि सिनेमॅटोग्राफीकडे दिलेले अपवादात्मक लक्ष यालाही त्याने दाद दिली आहे.
कतरिना कैफ 'द आर्चीज'साठी तिचा उत्साह रोखू शकली नाही. तिने लिहिले की, " हा चित्रपट आपल्याला 'निरागसता आणि मोहकता' च्या काळात परत घेऊन जातो. आजकाल आपल्याला याचा विसर पडत चाललाय असे दिसते. "इतकी सुंदर रचना आणि प्रत्येक फ्रेमवर लक्ष दिले गेले आहे. संगीत ही सर्वात कठीण शैली आहे आणि ती अगदी बरोबर आहे," असेही तिनं लिहिलंय. तिने कलाकारांच्या प्रत्येक सदस्याचे आणि दिग्दर्शक झोया अख्तरच्या प्रतिभेचं कौतुक केलं.
सोहेल खानची माजी पत्नी सीमा किरण सचदेवने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "मला द आर्चिज खूप आवडला. आठवणींच्या जगातील या आश्चर्यकारक प्रवासाबद्दल धन्यवाद! सर्व परफॉर्मन्स आणि प्रत्येक डिटेल्सनं लक्ष वेधून घेतले. तुम्ही लोक अद्भूत आहात."